शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे; कोरोना काळात झाले ज्येष्ठांचे झाले हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाचे २ लाख ५० हजार लाेक आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण १६ पोलीस ठाणे असून १२८ पोलीस अधिकारी, तर २२१० पोलीस कर्मचारी आहेत. परंतु या पोलिसांनी घरात एकटे राहणाऱ्या वृध्दांकडे कोरोनाच्या काळात ढुंकूनसुध्दा पाहिले नाही. काेणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती एकटे वृध्द राहतात याची माहिती पोलिसांकडे  उपलब्धच नाही.

ठळक मुद्देकाळजी घेणारी यंत्रणाच निरस, व्यथा मांडणार कुठे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या काळात सरकारने लॉकडाऊन केले, परंतु योग्य नियोजन न केल्यामुळे घरात एकटे राहणाऱ्या वृध्दांची फार गैरसोय झाली. हातात पैसा नाही, दुकाने सुरू नाहीत, मिळेल त्या जीवनावश्यक वस्तू दुपटीच्या भावात अशात जीवन जगणे त्यांना कठीण झाले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कुणी नातेवाईक भेटायला आले नाही. पोलिसांनीही साधा फेरफटका मारला नाही. पोलीस गल्लीतून फिरले तर आपली समस्या कुणाला सांगणार या हेतूने वृध्द लोक मुकाट्याने त्रास सहन करीत घरातच राहिले. गोंदिया जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाचे २ लाख ५० हजार लाेक आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण १६ पोलीस ठाणे असून १२८ पोलीस अधिकारी, तर २२१० पोलीस कर्मचारी आहेत. परंतु या पोलिसांनी घरात एकटे राहणाऱ्या वृध्दांकडे कोरोनाच्या काळात ढुंकूनसुध्दा पाहिले नाही. काेणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती एकटे वृध्द राहतात याची माहिती पोलिसांकडे  उपलब्धच नाही. लोकसंख्येच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचीही कमतरता आहे.  कोरोनाच्या काळात फ्रंट  वर्कर म्हणून  काम  करणाऱ्या पोलिसांवर कामाचा ताण असल्यामुळे त्यांना वृध्दांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.  पाेलिसांपेक्षा शहरातील काही सामाजिक संस्थांनी ज्येष्ठांना मदत करण्याचे काम केले. 

औषध आणण्यासाठी सोय नाही- उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार घेऊन जगणाऱ्या वृध्दांना औषधापासून वंचित राहावे लागले. कधी मोहल्लातील लोक औषध आणून देत होते, तर कधी घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने औषध कसे आणायचे हा प्रश्न पडला. कोरोनाच्या कालावधीत याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला. 

एकटे राहणाऱ्या वृध्दांची संख्या नाेंदच नाही

आमगाव पोलीस ठाणे६० वर्षांवरील लोकांची संख्या किती हा रेकार्ड आमच्याकडे राहात नाही. गरजवंताला आम्ही मदत करतो. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करतो.

गोंदिया शहर पोलीस ठाणेकोरोनाच्या काळात प्रत्येक पोलीस कामात व्यस्त होता.  ज्याला मदतीची गरज आहे त्यांना मदत पोलिसांनी केली. परंतु एकटे कोण घरी आहे याची कल्पना पोलिसांना नव्हती.

रामगर पोलीस ठाणेकोरोनाच्या काळात रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे यावर पोलीस बंदोबस्त करीत होती. ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांनी मदतीची हाक मारली त्यांच्या मदतीसाठी पोलीस धावून गेले, परंतु ६० वर्षांवरील कोण व्यक्ती एकटे आहेत. कुणाला मदतीची गरज आहे हे पोलिसांना कसे कळणार? मदत मागतील तेव्हाच मदत करता येईल.

आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही

आपण जीवन जगत असताना पोलिसांनी आपल्याला मदतीची गरज आहे का, असे कधीच विचारणा केली नाही. आपल्या जीवनातील कष्ट आपणच भोगत आहे.- शकुंतलाबाई पंधरवार, पदमपूर

आयुष्याची ६५ वर्षे ओलांडली असताना आता एकाकी जीवन जगत आहे. परंतु मदत करण्यासाठी आतापर्यंत कुणी पाेलीस किंवा जिल्हा प्रशासन पुढे आले नाही. आपल्याला जमेल तेवढा खटाटोप करून जीवन जगण्याचे धाडस करते. - कामनबाई मौजे, पोवारीटोला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस