शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एकटे राहणाऱ्या वृध्दांची सुरक्षा रामभरोसे; कोरोना काळात झाले हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

गोंदिया जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाचे २ लाख ५० हजार लाेक आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण १६ पोलीस ठाणे असून ...

गोंदिया जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाचे २ लाख ५० हजार लाेक आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण १६ पोलीस ठाणे असून १२८ पोलीस अधिकारी, तर २२१० पोलीस कर्मचारी आहेत. परंतु या पोलिसांनी घरात एकटे राहणाऱ्या वृध्दांकडे कोरोनाच्या काळात ढुंकूनसुध्दा पाहिले नाही. काेणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती एकटे वृध्द राहतात याची माहिती पोलिसांकडे उपलब्धच नाही. लोकसंख्येच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचीही कमतरता आहे. कोरोनाच्या काळात फ्रंट वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिसांवर कामाचा ताण असल्यामुळे त्यांना वृध्दांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.

....................................................

जिल्ह्यातील पोलीस ठाणे- १६ पोलीस अधिकारी- १२८

पोलीस-२२१०

जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाची लोकसंख्या- २ लाख ५० हजार

.........................

एकटे राहणाऱ्या वृध्दांची संख्या नाेंदच नाही

१) आमगाव पोलीस ठाणे

६० वर्षांवरील लोकांची संख्या किती हा रेकार्ड आमच्याकडे राहात नाही. गरजवंताला आम्ही मदत करतो. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करतो.

२) गोंदिया शहर पोलीस ठाणे

कोरोनाच्या काळात प्रत्येक पोलीस कामात व्यस्त होता. ज्याला मदतीची गरज आहे त्यांना मदत पोलिसांनी केली. परंतु एकटे कोण घरी आहे याची कल्पना पोलिसांना नव्हती.

३) रामगर पोलीस ठाणे

कोरोनाच्या काळात रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे यावर पोलीस बंदोबस्त करीत होती. ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांनी मदतीची हाक मारली त्यांच्या मदतीसाठी पोलीस धावून गेले, परंतु ६० वर्षांवरील कोण व्यक्ती एकटे आहेत. कुणाला मदतीची गरज आहे हे पोलिसांना कसे कळणार? मदत मागतील तेव्हाच मदत करता येईल.

......................................

औषध आणण्यासाठी सोय नाही

उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार घेऊन जगणाऱ्या वृध्दांना औषधापासून वंचित राहावे लागले. कधी मोहल्लातील लोक औषध आणून देत होते, तर कधी घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने औषध कसे आणायचे हा प्रश्न पडला.

...............

आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही

आपण जीवन जगत असताना पोलिसांनी आपल्याला मदतीची गरज आहे का, असे कधीच विचारणा केली नाही. आपल्या जीवनातील कष्ट आपणच भोगत आहे.

- शकुंतलाबाई पंधरवार, पदमपूर

.....

आयुष्याची ६५ वर्षे ओलांडली असताना आता एकाकी जीवन जगत आहे. परंतु मदत करण्यासाठी आतापर्यंत कुणी पाेलीस किंवा जिल्हा प्रशासन पुढे आले नाही. आपल्याला जमेल तेवढा खटाटोप करून जीवन जगण्याचे धाडस करते.

- कामनबाई मौजे, पोवारीटोला