अर्जुनी-मोरगाव : परिसरामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसावा व शासकीय महसुलात वाढ व्हावी या उद्देशाने बोंडगावदेवी येथील तलाठी एम.एन.टेभुर्णीकर यांनी बुधवारी (दि.१२) सकाळी ८ वाजतादरम्यान मुख्य चौकामध्ये विनापरवाना रेती नेत असलेला ट्रॅक्टर पकडला. त्याला १० हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.बोंडगावदेवी येथील मुख्य चौकामधून भरधाव जाणारा ट्रॅक्टर (एमएच ३६/ एल-३६४७) दिघोरी/मोठी येथील असल्याचे सांगितले जाते. या ट्रॅक्टर मालकांवर अवैधपणे गौण खनिजांची वाहतुक केल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून १० हजार ४०० रु. दंडात्मक वसूल करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
रेतीचा ट्रॅक्टर पकडला, १०,४०० रुपयांचा दंड
By admin | Updated: April 14, 2017 01:43 IST