शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना लिपिकाला अटक

By admin | Updated: May 25, 2017 00:49 IST

१२ वी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याकरीता महिला व बालकल्याण विभाग गोंदियाकडून १३ विद्यार्थी पुरविण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १२ वी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याकरीता महिला व बालकल्याण विभाग गोंदियाकडून १३ विद्यार्थी पुरविण्यात आले होते. त्याचा मोबदला म्हणून ६५० रूपयाची लाच मागणाऱ्या लिपीकाला लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई २४ मे रोजी करण्यात आली.तक्रारकर्ते हे संगणक इन्स्टीट्यूट चालक आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महिला व बालकल्याण समिती राबवित असलेल्या योजना राबवायच्या आहेत. सन २०१५-२०१६ या आर्थीक वर्षात ग्रामीण भागातील ७ वी ते १२ वी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याकरीता महिला व बालकल्याण विभागाकडून १३ विद्यार्थी पुरविले होते. तेथील लिपीक प्रविण देशभ्रतार यांनी इन्स्टीट्यूट चालकाला १३ विद्यार्थी पुरविल्यांचा मोबदला म्हणून प्रत्येक विद्यार्थ्या मागे ५० रुपये प्रमाणे ६५० रुपयाची मागणी केली. सदर रक्कम प्रविण देशभ्रतार यांना देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोदिया येथे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी संबधात पडताळणी करून २४ मे रोजी सापळा कारवाईसाठी सापळा रचून जिल्हा परिषद गोंदियाच्या महिला व बालकल्याण विभागातील कनिष्ठ सहायक प्रविण गुलजार देशभ्रतार याला ५०० रूपये लाच घेताना अटक करण्यात आली. ६५० रूपयाची मागणी असली तरी तडजोड करून ५०० रूपये देण्याचे ठरले होते. त्याच्या विरूध्द गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कलम ७,१३(१) (ड) सह कलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, पोलीस हवालदार शेंद्रे, प्रदीप तुळसकर, नायक पोलीस शिपाई रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, महिला शिपाई वंदना, चालक देवानंद मारबते व इतर कर्मचाऱ्यांनी केली.