शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात सुरु होणार आजपासून शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण २७५ शाळा आहेत. यात १७५ कनिष्ट विद्यालय आणि उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. या शाळा आणि विद्यालयांमध्ये २८०० शिक्षक व २ हजारावर इतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल मुख्याध्यापकांकडे सादर करायचा आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांचे सॅनिटायझेशन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर खासगी शाळांच्या सॅनिटायझेशनची जबाबदारी व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन : फिजिकल डिस्टन्सिंगची काळजी, शिक्षकांच्या चाचण्या शिल्लक

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शालेय शिक्षण विभागाने ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सोमवारपासून (दि.२३) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील २७५ शाळा सुरु होणार असून त्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळांचे सॅनिटायझेशन, पालकांचे संमतीपत्र आदींचे पालन करीत कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु होणार आहे. मात्र प्रत्यक्षात किती शाळा सुरु होणार आणि किती विद्यार्थी येणार हे मात्र सोमवारीच स्पष्ट होईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील ९ महिन्यांपासून शाळा महाविद्यालय पूर्ण बंद आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याची बाब लक्षात घेत शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण २७५ शाळा आहेत. यात १७५ कनिष्ट विद्यालय आणि उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. या शाळा आणि विद्यालयांमध्ये २८०० शिक्षक व २ हजारावर इतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल मुख्याध्यापकांकडे सादर करायचा आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांचे सॅनिटायझेशन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर खासगी शाळांच्या सॅनिटायझेशनची जबाबदारी व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेक शाळांचे सॅनिटायझेशन मागील तीन चार दिवसांपासून सुरु आहे. शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहात फिजिकल डिस्टिन्सिंगचे पालन केले जावे यासाठी वर्तुळ आखण्यात आले आहे. शाळेच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या मर्जीने शाळेत पाठविण्यात येत असल्याचे संमत्तीपत्र पालकांकडून भरुन घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्यांचे प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रीनिंग केली जाणार असून सॅनिटायझरची सुध्दा व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारपासून शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक आणि शिक्षकांची यासर्व गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी धडपड सुरु आहे. तसेच शाळेच्या प्रवेशव्दारावर कोरोनाविषयक जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहे.  

टेस्ट पूर्ण न झालेल्या शाळा उशिरा सुरु होणार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचे निर्देश असले तरी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळेच्या शिक्षकांची कोरोना चाचणी झाली नसेल त्या शाळा त्यांची चाचणी पूर्ण झाल्यावरच सुरु करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख देणार भेटी कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु होणार आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहे. पथक सोमवारी विविध शाळांना भेटी तेथील सोयी सुविधांची पाहणी करुन आपला अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत. खासगी शाळांना करावा लागणार खर्चमागील नऊ महिन्यापासून शाळा बंद असल्याने व्यवस्थापनाच्या शाळांची आधी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात आता त्यांना शाळांचे सॅनिटायझेशन, थर्मल गन तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या आहे. हा सर्व खर्च व्यवस्थापानाला करावा लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शाळा आणि विद्यालयांना देण्यात आली आहे. शिवाय मी स्वत: शाळांना भेटी देऊन याची पाहणी करणार आहे. - प्रफुल्ल कछवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक.

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या