शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण की शोषण आहार?

By admin | Updated: September 2, 2016 23:58 IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्हाला देण्यात येत असलेल्या खिचडीत अनेकांची ‘खिचडी’ पकते. त्यामुळे शालेय पोषणहार देणारा

आमगाव : शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्हाला देण्यात येत असलेल्या खिचडीत अनेकांची ‘खिचडी’ पकते. त्यामुळे शालेय पोषणहार देणारा व घेणारा हाच खरा शोषणहार असल्याचे दिसून येत आहे.शासनाकडून सुरु झालेल्या शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना जो निकष ठरवून देण्याचे ठरले आहे त्या निकषाचा योग्य उपयोग होत नाही. पोषण आहाराअंतर्गत प्रत्येक शाळेत खिचडी तयार होते. अद्यावत रेकॉर्ड तयार केला जातो. मात्र तो रेकार्ड फक्त देखावा आहे. शळेला दिलेला धान्यसाठा हा विद्यार्थी संख्येनुसार असतो. त्यात उपस्थिती शाळेत कायम राहिली पाहिजे हा मुख्य उद्देश आहे. मग वाटप झालेला पोषण आहार शाळेत महिन्याकाठी उरतो कसा? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. साठा कसा उरेल हीच नामी युक्ती देणाऱ्याकडे व घेणाऱ्याकडे आहे. तेथूनच मलाई लाटणे प्रारंभ होते. आॅनलाईन प्रक्रिया सांगून सर्वच बरोबर आहे असे सांगितल्या जाते. महिन्याकाठी उरलेला साठा कोण तपासणार? यासाठी ठोस वेळापत्रक शासनाकडे नाही. योजना सुरु झाली, मात्र वास्तविक त्याची खरी अंमलबजावणी नाही. गटशिक्षणाधिकारी किंवा केंद्र प्रमुखाकडून ही माहिती वरच्या स्तरावर सादर केली जाते. हीच खरी मलाईची खरी जड आहे. शालेय पोषण आहार एकाच एजंसीकडे अनेक वर्ष दिल्याने कोणत्या मार्गाने गेल्याने काय नफा-तोटा होतो हे त्यांना माहित आहे. एजंसीला एवढा पैसा न देता गावातील महिला बचत गटांना दरवर्षी बचत गट बदलवून दिले तर गावातील शाळेत शालेय पोषण आहाराचे शोषण होणार नाही. किंवा सरळ महिन्याचा पैसा शासनाने महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)