शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराच्या आश्वासनानंतर उघडले शाळेचे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:45 IST

देवरी तालुक्यातील ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या रिक्त पदाला घेऊन शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, ....

ठळक मुद्देककोडी येथील शिक्षक नियुक्ती प्रकरण : पालकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या रिक्त पदाला घेऊन शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकºयांनी घेतली होती. अखेर चिचगडचे ठाणेदार यांच्या मध्यस्तीनंतर शुक्रवारी (दि.२४) चौथ्या दिवशी कुलूप उघडण्यात आले.ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेत तीन महिन्याचा कालावधी लोटूनही दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी मागील तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. वांरवार शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी करुन सुध्दा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकाची नियुक्ती केली नाही. गावकऱ्यांनी ८ आॅगस्टला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देवून शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.मात्र शिक्षण विभागाने याला गांर्भियाने घेतले नाही.त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी व पालकांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून शाळा बंद होती. शुक्रवारी (दि.२४) चिचगडचे ठाणेदार नागेश भास्कर यांनी ककोडी येथे पोहचून शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले. मात्र २७ आॅगस्टपर्यंत शिक्षकाची नियुक्ती न केल्यास पुन्हा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.दरम्यान या प्रकरणाची आ.संजय पुराम यांनी दखल घेत शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षणाधिकाऱ्यांना त्वरित यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मुख्याध्यापक आंदेलवाड यांना विचारणा केली असता त्यांनी एक शिक्षक रुजू झाले असून दुसरे शिक्षक रुजू होणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाPoliceपोलिस