शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एफडीचे पैसे न दिल्याने स्टेट बँकेला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील ग्राम ढिमरटोली (परसोडी) येथील नरेश ढेकवारे यांनी आपली तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दाखल केली होती. त्यांचे वडील मानिकलाल ढेकवारे यांचा अपघातात मृत्यू झाला. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १४० नुसार नुकसान भरपाई करण्यासाठी एमएसीटी गोंदिया यांच्याकडे तक्रार करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्टेट बँक आॅफ इंडियाने ग्राहकाला एफडीचे पैसे न दिल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने बँकेला दंड ठोठावला आहे. तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष भास्कर योगी, सदस्य एस.बी.रायपुरे यांनी सुनावनी करताना सन २०१३ च्या व्याजदरानुसार ग्राहकाला रक्कम परत करण्याचे आदेश व्यवस्थापकाला दिले. शिवाय, मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये व तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात न्याय मंचने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (नागपूर) विरुद्ध कुठलाही आदेश दिला नाही.लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील ग्राम ढिमरटोली (परसोडी) येथील नरेश ढेकवारे यांनी आपली तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दाखल केली होती. त्यांचे वडील मानिकलाल ढेकवारे यांचा अपघातात मृत्यू झाला. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १४० नुसार नुकसान भरपाई करण्यासाठी एमएसीटी गोंदिया यांच्याकडे तक्रार करण्यात आली. एमएसीटी ने १२ जून २०१२ रोजी नो फॉल्ट लाईबिलीटी अमाऊंट म्हणून ५० हजार रुपये नॅशनल इन्शुरन्स कंपनीला देण्याचे आदेश दिले. त्यावेळेस नरेश अल्पवयीन होते व त्यामुळे अपघाती न्यायालयाने १० हजार २१० रुपये तक्रारदार सज्ञान होईपर्यंत त्याच्या नावाने फिक्स डिपॉजीट करण्याचे आदेश दिले होते. नरेश ढेकवारे सज्ञान झाल्यावर स्टेट बँकेत जाऊन त्यांनी आपले पैसे मागीतले तेव्हा त्यांची एफडीच काढण्यात आली नाही असे लक्षात आले.वेळोवेळी न्यायालयाच्या चकरा काढूनही त्यांना फायदा झाला नाही. यावर त्यांनी आरपीआय अ‍ॅक्टनुसार अर्ज केला. परिणामी एमएसीटीच्या आदेशावर बँकेला एफडी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु बँकेने या संदर्भात कसलेही उत्तर दिले नाही. परिणामी नरेश ढेकवारे ग्राहक न्यायालयात गेले व ६ जुलै २०१३ रोजी त्यांनी व्याजासह एफडी जमा करण्याची मागणी केली. मानसिक त्रासापोटी १० हजार रूपये, १५ टक्के व्याज व तक्रारकर्त्याचा खर्च देण्याची मागणी केली.ग्राहक न्यायालयासमोर प्रकरण आल्यावर एफडीची रक्कम देण्यास नकार व ग्राहकांना झालेला त्रास, एफडीची रक्कम देताना एफडी अकाऊंट उघडणे, केवायसी दाखल करण्याचे नियम व अटी नव्हत्या. एमएसीटी ने एफडी करण्याचा आदेश दिल्यावर त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे १० हजार २१० रुपये व्याजासहीत २०१३ पासून आतापर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले. मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये व तक्रारकर्त्याचा खर्च म्हणून पाच हजार रुपये नरेश ढेकवारे यांना देण्याचे आदेश स्टेट बँकेला देण्यात आले.

टॅग्स :SBIएसबीआय