शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मशागतीच्या कामांना उन्हाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:22 IST

एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकरी हैराण : बी-बियाणे, खतांच्या नियोजनाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याआधी महिनाभरापुर्वीपासून बळीराजा खरीपासाठी सज्ज होत असतो. शेतात खत टाकणे, नांगरणी करणे, शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी वरखणी करणे आदि कामे तो करीत असतो.परंतु यंदा उष्णतेमुळे जिल्ह्यात शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. ही कामे केव्हा व कधी होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पारा भडकला आहे, ही उष्णता कधी कमी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.या उष्णतेची झळ पोहोचत असली तरीही काही शेतकरी सकाळी-सकाळी शेतीची कामे उकरण्यात मग्न दिसून येत आहेत. शेतकरी शेतीच्या कामांना एकएक करुन करण्याच्या प्रयत्नात आहेत. हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना शेतीची पूर्वमशागत त्वरित करवून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी