शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

शनिवारचाच पाऊस खरा !

By admin | Updated: July 4, 2016 01:22 IST

पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता.

सरासरी ५१.१० मिमी. नोंद : पेरणीसह वृक्षारोपणालाही फायदागोंदिया : पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता. मात्र शनिवारी (दि.२) बरसलेल्या पावसाने ही पोकळी भरून काढली असून शनिवारी बरसलेल्या पावसानंतरच पावसाळा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ५१.१० मीमी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारचाच पाऊस खरा असा सुर ऐकू येत आहे. विशेष म्हणजे रविवारीही (दि.३) शहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील शेतकरी मागील चार वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका सहन करीत आहेत. आता खरीप हंगामाचा संपूर्ण भरवसा केवळ पावसावरच अवलंबून होता. शनिवार (दि.२) पूर्वीपर्यंत जिल्ह्यात केवळ १५ टक्केच बियाण्यांची पेरणी झाली होती. उन्हामुळे उगवलेल्या खारी वाळल्या व करपलेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी थांबविली होती. कदाचित खरीप हंगाम लांबण्याची भीती त्यांच्यात निर्माण झाली होती. यावर्षी पावसाचा जोर चांगला असेल, असा हवामान खात्याचा अंदाजच फोल ठरण्याची शक्यता निर्माण झालेली दिसत होती. मात्र शनिवारी जिल्ह्यात बरसलेल्या सरासरी ५१.१० मिमी. पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसानंतर त्यांनी बियाणे पेरणीचा शुभारंभ केला आहे. रखडलेल्या पेरण्या पूर्ण करण्याच्या तयारीत शेतकरी गुंतला आहे. तर जिल्ह्याभरात होत असलेल्या वृक्षारोपण अभियानासाठी जमिनीतही ओलावा निर्माण झाल्याने त्यांचे संवर्धन होण्याचा विश्वासही बळावला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५१.१० मिमी पाऊस बरसला आहे. यात गोंदिया तालुका ७५ मिमी, तिरोडा तालुका ११०.८० मिमी, गोरेगाव तालुका ४४.२० मिमी, आमगाव तालुका ७५.८० मिमी, सालेकसा तालुका ४६ मिमी, देवरी तालुका १५ मिमी, सडक-अर्जुनी तालुका २८ मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४.२० मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी (दि.३) जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत सरासरी १९०.८० मिमी पाऊस१ जून ते ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९०.८० मिमी पाऊस झालेला आहे. यात गोंदिया तालुका १४९ मिमी, तिरोडा तालुका २९९.९०, गोरेगाव तालुका १९८.२० मिमी, आमगाव तालुका १७०.६० मिमी, सालेकसा तालुका २०८.६० मिमी, देवरी तालुका १२७ मिमी, सडक-अर्जुनी तालुका १८०.२० मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आतापर्यंत १९३ मिमी पाऊस झालेला आहे. गाय व बैलाचा मृत्यूशनिवारच्या पावसामुळे कटंगटोला येथे दोन वीज पोल तुटून पडले. त्यामुळे करंट प्रवाहित होवून एका बैलाचा मृत्यू झाला. हिवराज नंदलाल लिल्हारे (रा.कटंगटोला) यांच्या मालकीचा बैल होता. तर हिवरा येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून करंट लागून एका गाईचा मृत्यू झाला.