शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

महिलांच्या स्वावलंबनाला संजीवनीचा आधार

By admin | Updated: September 8, 2016 00:31 IST

ग्रामीण भागातील कष्टकरी महिला पदरमोड करून पैशाची बचत करीत आहेत.

आर्थिक विकास : शेतीच्या सिंचनासह थाटले अनेक व्यवसायगोंदिया : ग्रामीण भागातील कष्टकरी महिला पदरमोड करून पैशाची बचत करीत आहेत. हाच पैसा त्यांना बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यास आधार ठरला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत करून आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, उद्योजकता विकासाबाबत प्रशिक्षण देवून आणि योग्य मार्गदर्शनातून स्वावलंबनाचा मार्ग दाखिवला आहे. गोवारीटोल्यातील आदिवासीबहुल महिला सभासदांसाठी संजीवनी आदिवासी स्वयं सहाय्यता महिला बचतगट त्यांच्यासाठी मार्गदाता ठरला आहे.गोरेगाव तालुका मुख्यालयापासून २३ कि.मी. अंतरावर असलेले गोवारीटोला हे गांव. गावातील १० आदिवासी व अन्य समाजातील महिलांनी एकत्र येवून संजीवनी महिला बचतगटाची स्थापना २० आॅक्टोबर २००८ रोजी आदिवासी उपयोजनेंतर्गत केली. चोपा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजीवनी बचतगटाने आपले बचत खाते उघडले. सुरु वातीला ५० रूपये याप्रमाणे बचतगटातील प्रत्येक महिला बँकेत महिन्याकाठी बचत करु लागली. माविमच्या मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास बळावला. जानेवारी २०१३ पासून प्रत्येक महिला महिन्याला १०० रूपये बचतगटाच्या बँक खात्यात पैसे जमा करु लागली. महिलांची दर महिन्याला नियमित बचत आणि अंतर्गत आर्थिक देवाण-घेवाण बघून दिलेले प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे आपणही उद्योग-व्यवसाय सुरु करु न स्वावलंबी होवू शकतो, असा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाला. गटातील अंतर्गत कर्जाचा उपयोग महिलांनी शेती, आरोग्य, घरकाम आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी केला. माविमच्या माध्यमातून संजीवनीच्या महिलांना आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, लेखा संच आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण मिळाले.बचतगटातील महिलांनी आपल्या कष्टातून जमा केलेले ३६ हजार रूपये ३ वर्षाकरिता जानेवारी २०१५ मध्ये फिक्स डिपॉझीट केले. आता त्यांना जानेवारी २०१८ मध्ये ४८ हजार रूपये मिळणार आहेत. बचतगटातील महिलांची अंतर्गत कर्जामध्ये गरज पूर्ण होत नसल्यामुळे माविमच्या सहयोगिनी रत्नमाला सरजारे यांच्या मार्गदर्शनाने आयसीआयसीआय बँकेकडून १६ एप्रिल २०१३ ला एक लाख ९६ हजार ९०० रु पयांचे कर्ज मिळवून दिले. तसेच १६ नोव्हेंबर २०१५ मध्ये याच बँकेकडून पुन्हा ३ लाख ३४ हजार ८०० रु पये बचतगटाला कर्ज मिळवून देण्यात सहयोगिनी सरजारे यांनी मोलाची मदत केली. बचतगटातील उत्तरा औरासे यांनी ५० हजार रु पये, रु पाली औरासे यांनी ५० हजार रु पये आणि छाया येळे यांनी ७५ हजार रु पये कर्ज घेवून शेतीला सिंचनाची बारमाही व्यवस्था व्हावी म्हणून स्वत:च्या शेतात बोअरवेल करून घेतली. केवळ खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या महिलांना रबी व उन्हाळी पिकांसाठी बोअरवेल उपयुक्त ठरली. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थोड्या शेतीतून उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली. शेवंता बिसेन यांनी ७५ हजार रु पयांतून मालवाहक गाडी खरेदी केली. तसेच बचतगटातून अंतर्गत कर्ज म्हणून ४५ हजार रूपये घेवून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरु केला. बचतगटामुळे मालवाहक गाडीला भाडे मिळू लागले आणि डेकोरेशनचा व्यवसायही चांगला चालू लागला.संजीवनी महिला स्वयंसहायता बचतगटामुळे महिलांच्या उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत वाढण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास आर्थिक हातभार लागण्यासही मदत झाली. (प्रतिनिधी )‘संजीवनी’चे अनेक सामाजिक उपक्रमगोवारीटोल्यात संजीवनी बचतगटाच्या महिला थोर पुरु षांच्या जयंती, पुण्यतिथींचे तसेच विविध स्पर्धांचे देखील आयोजन करीत आहे. कुपोषण निर्मूलन, वृक्षारोपण, बेटी बचाव-बेटी बढाओ यासारख्या उपक्रमात संजीवनीच्या सभासद महिला उत्साहाने भाग घेत आहेत. ग्रामसभा, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या महिला अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचतगटामुळेच त्यांना स्वावलंबाची संजीवनी मिळाली असून कुटुंबाच्या अर्थाजनात बचतगटातील सदस्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. पूर्वी केवळ चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित असलेल्या महिला बचतगटामुळे स्वावलंबी होत असताना दिसून येत आहे.