शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी

By admin | Updated: July 21, 2014 23:56 IST

पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी,

काचेवानी : पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी, असा सल्ला तिरोडा कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी पावसाच्या अभावाने बळीराजा खूप धास्तावला आहे. कडक उन्हामुळे पेरण्यांचे अंकुर वाळले आहेत. वरचे धान्य चिमण्या-पाखरांनी वेचून आपले आहार बनविले. त्यामुळे झालेल्या पेरण्यांमधील ५० ते ६० टक्के बियाणे नाहिसे झाले. वास्तव म्हणजे यावेळी पेरणी करायची की नाही अशा गंभीर विचारात बळीराजा पडलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी केलेली आहे. अशीच परिस्थिती असली तर दुबार पेरणीसुद्धा नष्ट होईल. यावर तिरोडा कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, यावर्षी पाऊस उशिरा येणार असला तरी पाऊस समाधानकारक होईल. पेरण्या बिघडल्या, ५० ते ६० टक्के रोपे नाहिसे झाले. तरी शेतकऱ्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही. शेतकऱ्यांनी हिंमत बांधून आणि संयम बाळगून सतर्कतेने शेतीची रोवणी करण्याचा सल्ला रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला. पेरण्या बिघडल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या कमीत कमी २५ ते ५० टक्के जमिनीत रोवणीची कामे होणार नाहीत. परंपरागत पद्धतीने रोवणी केल्याने ही समस्या उद्भवणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीमध्ये (श्रीपद्धती) व कृषी विभागाच्या सल्ल्याने रोवणीचे कार्य केल्यास शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे मत मंडळ कृषी अधिकारी रहांगडाले यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. २५ बाय २५ सेमी अंतरावर श्रीपद्धतीने पेरणी करून एक किंवा दोन रोपे लावावी. बांधीत पाणी ठेवू नये व बांध्या वाळणार नाही याची काळजी घेवून रोवणीचे कार्य केल्यास दुबार पेरण्या करण्याची गरज भासणार नाही. आणि रोपे कमी असल्याने शेती पडीक राहण्याची समस्या उद्भवणार नाही. शासकीय यंत्रणा आणि कृषी विभाग शेतकऱ्यांवर होत असणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल चिंतेत असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे तात्काळ कामे केली जातील. शेतकऱ्यांच्या हितासाठी येणाऱ्या योजना व सुविधांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत विशेषत: हिंदू धर्मामध्ये आजही धार्मिक विधीला, नक्षत्रांना मान्यता आहे. पुरातन काळापासून आजही ईश्वरीय शक्तीवर विश्वास आहे. पावसाळ्याचे दिवस आले की प्रत्येक व्यक्ती नक्षत्र केव्हा लागणार आणि केव्हा बदलणार, याकडे लक्ष ठेवतो. मृग नक्षत्रात पेरण्या करणे योग्य असते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पेरण्या वेळेत झाल्या. अर्दळा नक्षत्रात पाऊस भरपूर येतो, अशी शेतकऱ्यांची आशा असते. परंतु यावर्षी निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा तळागाळाला गेली आणि त्यांना निराश व्हावे लागले. सध्या फुक आणि यानंतर फुंडरस या नक्षत्रात पाऊस जोर पकडत नाही, अशी समजूत आहे. यानंतर नक्षत्र असरका लागणार असून या नक्षत्रात भरपूर पाऊस येतो. या नक्षत्रात रोवणी केल्यास ‘असरकाच्या सुटल्या पेंड्या आणि धान झाले कुडो खंड्या’ अशी शेतकऱ्यांची समजूत आहे. निसर्गाने आताही साथ दिल्यास शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळू शकते. पेरण्या बिघडल्या, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे खरे. मात्र आताही निसर्गाने कृपा केली तर शेतकऱ्यांचा लाग होईल. (वार्ताहर)