शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

‘सायलेन्स झोन’मध्ये उभारणार समाजभवन

By admin | Updated: January 1, 2015 23:02 IST

शहराच्या मध्यवस्तीमधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समोरील भागात समाजभवनाचे (कॉम्युनिटी हॉल) बांधकाम करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र हा परिसर

गोंदिया : शहराच्या मध्यवस्तीमधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समोरील भागात समाजभवनाचे (कॉम्युनिटी हॉल) बांधकाम करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र हा परिसर ‘सायलेन्ट झोन’ असताना या ठिकाणी समाजभवनाला परवानगी देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी समाजभवनाची उभारणी होण्याच्या पार्श्वभूमीवर गंगाबाई रुग्णालय प्रशासनासह समस्त डॉक्टरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.शहरातील सिव्हील लाईन परिसरात ७५ वर्षे जुने बाई गंगाबाई सरकारी महिला रुग्णालय कार्यरत आहे. २०० खाटांच्या या रुग्णालयात जिल्हाभरातून महिला व बालकांना उपचारासाठी दाखल केले जात असल्याने हे रुग्णालय सदैव रुग्णांनी खचाखच भरून असते. या रुग्णालय परिसरातच आता शासकीय नर्सिंग कॉलेजचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या एक बाजुला बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्गही सुरू होणार आहेत, तर दुसऱ्या बाजुला असलेल्या रिकाम्या जागेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे क्वॉर्टर्स बनविले जाणार आहेत. या क्वॉर्टर्सच्या समोरसमोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने असलेल्या पडिक क्वॉर्टर्सच्या जागेवर समाजभवन बनविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.समाजभवनासाठी दिली जात असलेली प्रस्तावित जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या जागेवर समाजभवनाची उभारणी करण्यासाठी ती जागा न.प.कडे हस्तांतरित करण्यात यावी, असा ठराव गोंदिया नगर परिषदेने तीन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत घेतला. त्यानुसार एक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. या समाजभवनासाठी नझुल सिट नं.८, ९ प्लॉट नं. ४, ४/१ आणि ४/२ वरील २१३६ चौरस मीटर जागेची मागणी नगर परिषदेने केली आहे. वास्तविक ही जागा रुग्णालयापासून आणि डॉक्टरांच्या प्रस्तावित क्वॉर्टर्सच्या जागेपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे हा परिसर ‘सायलेन्ट झोन’ मध्ये मोडतो. या ठिकाणी समाजभवन तयार झाल्यानंतर त्या भवनात विविध सार्वजनिक कार्यक्रम होतील. विवाह समारंभासारख्या कार्यक्रमामुळे बँड, डिजे सुद्धा तिथे वाजतील. त्यामुळे बाळंतपणासाठी या रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नवजात बाळांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. यातून त्या बाळांना बहिरेपणा किंवा महिलांना रक्तदाबासारखा त्रासही होऊ शकतो, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. असे असताना ही जागा सायलेन्स झोन आहे किंवा नाही, हेसुद्धा न.प.ला माहित नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नियम काय म्हणतो?उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने २१ एप्रिल २००९ आणि ७ आॅगस्ट २००९ ला जारी केलेल्या शासन आदेशात ध्वनीप्रदुषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्या रुग्णालयापासून १०० मीटर अंतरापर्यंतचा परिसर सायलेन्स झोन मानल्या जाईल असेही म्हटले आहे. मात्र प्रस्तावित समाजभवन हे रुग्णालयापासून ५० मीटरपेक्षाही कमी अंतरावर आहे. त्यामुळे या समाजभवनास परवानगी मिळाली तर ते सायलेन्ट झोनच्या नियमाचे उल्लंघनच होईल, असे मानले जात आहे.परवानगी देऊ नये- दोडकेगंगाबाई रुग्णालयाच्या परिसरात बनत असलेले समाजभवन अगदी योग्य नाही. अशा सार्वजनिक भवनात होणाऱ्या कार्यक्रमांचा रुग्णांना किती त्रास होईल, याचाही विचार करायला पाहीजे. रुग्णांना आवाजाचा त्रास होतो. साधे रुग्णाजवळ मोठ्या आवाजात बोलणेही योग्य नसते. तिथे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या डीजे, लाऊडस्पिकर, बँड वगैरेचा रुग्णांना किती त्रास होईल? ही चिड आणणारी गोष्ट आहे. खरे म्हणजे मलाही या परिसरात अशा पद्धतीचा हॉल बनत असल्याची कल्पना नव्हती. पण अलिकडेच याबद्दल कळले. प्रशासनाने अशा हॉलला या परिसरात परवानगी देऊ नये, असे मत गंगाबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांनी सांगितले.