शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा नगरपंचायत कार्यालयाला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

सालेकसातील काही अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी नवे-जुने रेकॉर्ड असलेले दस्तावेज ठेवले होते त्या दस्तावेज रेकार्ड रूममध्ये खिडकीतून आग लावण्याचे काम केले. आगीचा भडका उडाला असता नगरपंचायत कार्यालयाच्या मागे वास्तव्यास असलेल्या काही लोकांना कार्यालयाच्या आत आग लागली असल्याचे समजले. त्यांनी लगेच नगरपंचायतीच्या स्थानिक कर्मचाऱ्याला फोन लावून याची माहिती दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : येथील नगरपंचायत कार्यालयाला गावातील काही अज्ञात समाजकंटकांनी पहाटे आग लावल्यामुळे नगरपंचायत कार्यालयातील अनेक महत्त्वाचे दस्तावेज तसेच जवळपास अडीचशे फायली जळून राख झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. २६) पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, सालेकसातील काही अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी नवे-जुने रेकॉर्ड असलेले दस्तावेज ठेवले होते त्या दस्तावेज रेकार्ड रूममध्ये खिडकीतून आग लावण्याचे काम केले. आगीचा भडका उडाला असता नगरपंचायत कार्यालयाच्या मागे वास्तव्यास असलेल्या काही लोकांना कार्यालयाच्या आत आग लागली असल्याचे समजले. त्यांनी लगेच नगरपंचायतीच्या स्थानिक कर्मचाऱ्याला फोन लावून याची माहिती दिली. त्या कर्मचाऱ्याने नगरपंचायत येथे येऊन दस्तावेज जळताना पाहिले. त्यांनी नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अजय वाघमारे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून आपल्या सहकार्यासह आग विझविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आग विझविल्यामुळे कार्यालयातील बराच मोठा दस्तावेज व फायली आगीत राख होण्यापासून वाचविण्यात त्यांना यश आले. मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत नगरपंचायत कार्यालयातील जवळपास २५० फायली व इतर महत्त्वाचे दस्तावेज जळून राख झाले होते. 

जुने रेकॉर्ड जळालेया आगीत नगर पंचायतीच्या आधीचे ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड असलेल्या फायली जळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना जुन्या रेकॉर्डची माहिती प्राप्त करणे कठीण होणार आहे. सकाळी ७.०० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले. जळत असलेल्या फायली इमारतीच्या बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. 

सालेकसा पोलीस स्टेशनला तक्रार सालेकसा नगरपंचायत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहत आली आहे. येथील लोक नगरपंचायतीमध्ये आपल्या समस्या घेऊन येत असतात. अशात नगरपंचायत कार्यालयाला आग कोणी लावली हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून घटनेची तक्रार पोलीस स्टेशन सालेकसा येथे करण्यात आली. पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

 

टॅग्स :fireआग