शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

आता स्वस्त धान्य दुकानातून होणार स्टेशनरी साहित्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 16:15 IST

स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे.

ठळक मुद्देउत्पन्न वाढविण्यासाठी निर्णय कंपनी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात थेट करार शासनाचा हस्तक्षेप नसणार

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे. यासंबंधिचा निर्णय शासनाने ३० ऑक्टोबर रोजी घेतला असून याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर संकट ओढवण्याची शक्यता असून बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने शिधापत्रिकधारकांना स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात गहू,तांदूळ, तेल, साखर, तूरदाळ, चनादाळ उपलब्ध करुन देत आहेत. याचा लाभ केसरी आणि बीपीएल,अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना होत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना अन्न धान्य वितरणाच्या बदल्यात मिळणारे कमिश्न फार कमी असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर होता. त्यामुळे ही नाराजी दूर करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य आणि शालेय उपयोगी वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.या वस्तूंची विक्री करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेशनरी साहित्य विक्री करणाऱ्या कंपनीशी थेट करार करुन कमिश्न निश्चित करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत शासनाचा कुठलाही हस्तक्षेप नसेल. शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेनरी आणि शालेय उपयोगी साहित्य ठेवता येणार आहे. स्वस्त धान्य दुकान हे ग्रामीण भागात अधिक असून नियमित स्वस्त धान्याची उचल सुध्दा याच भागातील शिधापत्रिकाधारक हे अधिक प्रमाणात करतात. मात्र या निर्णयाचा काही स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे.त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. स्वस्त धान्य दुकानदाराच्या मागे आधीच भरपूर कामे आहेत त्यात तो स्टेशनरी साहित्य विक्री करणाºया कंपनीचा शोध घेऊन त्यांच्याशी करार केव्हा करणार, शिवाय कंपनीवर त्यांचे वजन पडणार का? त्यांना कंपनी योग्य प्रमाणात कमिश्न देणार का आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे.ग्रामीण भागात पुन्हा बेरोजगारी वाढणारस्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांना बसणार आहे. ग्रामीण भागात छोट्या छोट्या दुकानामध्ये स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री केली जाते. यातून गावातील छोट्या दुकानदारांची रोजी रोटी चालते. मात्र आता स्वस्त धान्य दुकानातून हे साहित्य विक्री केल्यास त्यांचा रोजगार हिरावला जाणार असून पुन्हा बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमी जागेची समस्यास्वस्त धान्य दुकान हे फार कमी जागेत असते. त्यातच अन्नधान्याचे पोते आणि इतर साहित्यामुळे जागाच शिल्लक राहत नाही. त्यातच आता स्टेशनरी साहित्य विक्री करायचे म्हटल्यास ते साहित्य ठेवण्यासाठी जागा लागेल, शिवाय त्यांना मनुष्यबळ सुध्दा वाढवावे लागेल. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना आधीच मिळणारे कमिश्न हे अल्प असल्याने त्यातच मनुष्यबळ ठेवल्यास त्याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये फारसा उत्साह नाही.

शासनाच्या नवीन धोरणामुळे आधीच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही ढासळत चालली आहे.त्यातच आता स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर बेरोजगारीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही.- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.

टॅग्स :Governmentसरकार