शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यातील धानाची सालेकसाच्या केंद्रावर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

रब्बी हंगामातील धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रावर ७ जुलै रोजी एकाच तासात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. या अजब खरेदीने शासन आणि प्रशासन सुध्दा आश्चर्यचकित झाले. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर चार विभागांतर्गत सध्या या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू असून, यात धान खरेदी केंद्र संचालकांनी केलेले अनेक घोळ आता पुढे येत आहे. सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर गोंदिया, आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे सातबारा जोडून धान खरेदी करण्यात आल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे या धान खरेदी केंद्र संचालकांवर आता फौजदारी आणि दंडात्मक कारवाई अटळ असल्याचे बोलले जाते. रब्बी हंगामातील धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रावर ७ जुलै रोजी एकाच तासात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. या अजब खरेदीने शासन आणि प्रशासन सुध्दा आश्चर्यचकित झाले. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर चार विभागांतर्गत सध्या या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान अनेक आश्चर्यकारक गोष्टी पुढे येत आहे. ज्या तालुक्यातील धान त्याच तालुक्यात विक्री करण्याचा नियम असताना सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर गोंदिया, आमगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे सातबारा जोडून धानाची विक्री करण्यात आली आहे. यातील बरेच सातबारा बोगसदेखील आहेत. तर आधीच खरेदी करून ठेवलेल्या धानाचे लॉट एकाच दिवशी ऑनलाइन पोर्टलवर एन्ट्री करून धान खरेदीचा आकडा फुगविण्यात आला. तर शेतकऱ्यांकडून धानाचे अतिरिक्त वजन घेण्यात आले. या सर्व बाबी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याची माहिती आहे. हे अधिकारी एकत्रित अहवाल सोमवारी (दि. १८) शासनाला सादर करणार असल्याची माहिती आहे. दोषी आढळणाऱ्या धान खरेदी संचालकांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई अटळ असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

चार विभागांच्या अहवालाची होणार चाचपणी - धान खरेदी केंद्रावर झालेल्या घोळाची सध्या वेगवेगळ्या चार विभागांकडून चौकशी सुरू आहे. या चारही समित्यांकडून सोमवारी शासनाकडे अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चौकशी अहवालाची चाचपणी करून नंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. 

ते केंद्र संचालक शोधतायत संकटमोचक - धान खरेदीतील घोळ आता अंगावर शेकणार असल्याची बाब धान खरेदी केंद्र संचालकांच्या लक्षात येताच या संकटात कोण बाहेर काढू शकतो, यासाठी संकटमोचकाचा शोध घेतला जात असल्याची जिल्ह्याच्या वर्तुळात आहे. त्यामुळे या संस्था चालकांना यातून कोण संकट मोचक भेटतो याकडे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड