शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विना परवाना पाठ्यपुस्तकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:44 IST

शहरातील काही नामांकित शाळांकडून शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात आहे. सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांवर बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची लूट सुरू आहे.

ठळक मुद्देसक्तीच्या नावावर लूट : प्रशासनाची बघ्याची भूमिका, पालक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील काही नामांकित शाळांकडून शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात आहे. सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांवर बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची लूट सुरू आहे. मात्र नियमानुसार शाळांना पाठपुस्तकांची शाळेतूनच खरेदी करण्याची सक्तीच करता येत नाही. तसेच या शाळांकडे पाठ्यपुस्तके विक्री करण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.मागील आठवडाभरापासून विविध शाळांच्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे. बाजारपेठेत सर्वच अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध आहे. मात्र शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. तर सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांच्या मुळ किंमतीपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची अक्षरक्ष: लूट केली जात आहे. पाठपुस्तकांवर वाढीव किंमतीचे स्टॉम्प मारले जात आहे. काही पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा विरोध केला. याची तक्रार सुध्दा शाळा व्यवस्थापनाकडे केली मात्र त्यांनी शाळेतूनच पाठपुस्तके घ्यावी लागतील. ती घ्यायची नसतील तर आपल्या पाल्याचा आमच्या शाळेत प्रवेश घेवू नका असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे पालक सुध्दा हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाळेला शिक्षणाचा अधिकार कायदातंर्गत शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती करता येत नाही. पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी नगर परिषद परवाना विभाग व संबंधित विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. ज्या शाळांकडे परवाना नसेल त्यांना याची विक्री करता येत नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नगर परिषद परवाना विभागाकडे जावून याची माहिती घेतली असता शहरातील एकाही खासगी शाळेकडे पाठ्यपुस्तकांची विक्री करण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत शहरातील एकाही खासगी शाळेने पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी परवाना घेण्यासाठी साधा अर्ज देखील केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे विना परवानाच हा सर्व प्रकार सुरू आहे. तर शिक्षण विभाग तक्रार नसल्याचे सागंत कारवाई टाळत आहे.कारवाई टाळण्यासाठी सोसायट्यांचा आधारकाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी शाळेतच खरेदी विक्री सोसायटीची स्थापना केली आहे. त्यामुळे जेव्हा या शाळांवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी जातात तेव्हा शाळा व्यवस्थापन त्यांना आमच्या शाळेत सोसायटी असून त्यातंर्गत पाठ्यपुस्तके विक्री करता येत असल्याचे सांगतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पाठ्यपुस्तकांसह वह्याबुक घेण्याची सक्तीशहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पाठपुस्तकांची शाळेतून खरेदी करण्याची सक्ती करताना यासोबत वह्याबुके देखील शाळेतून घेणे बंधनकारक केले आहे. यासाठी त्यांनी काही छापनेखाने मालकांशी करार केला असून त्यांच्याकडून वह्या बुकांची छपाई करुन त्यांच्या मनमर्जीच्या दरानुसार त्याची विद्यार्थ्यांना विक्री केली जात आहे.नगर परिषद करणार कारवाईनगर परिषद अधिनियमानुसार नगर परिषद क्षेत्रात कुठलाही व्यवसाय सुरू करताना नगर परिषदेच्या परवाना विभागाकडून त्याचा रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. विना परवाना व्यवसायक करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे नगर परिषद पाठ्यपुस्तकांची विक्री करणाºया खासगी शाळांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करेल असे परवाना विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा