लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ग्राहकांना केमिकलयुक्त पत्ताकोबी विक्री करण्यात आल्याचा प्रकार आमगाव येथे शनिवारी उघडकीस आला. त्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.येथील नगर परिषद श्रीरामटोली वार्ड क्रमांक ३ येथील रहिवासी बलोकचंद लिल्हारे यांनी आठवडी बाजारातून पत्ताकोबी विकत घेतली. ती त्यांनी घरी नेऊन कापली असता ती केमिकल युक्त असल्याचे आढळले. या प्रकारामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले असून बाजारातील भाजीपाला देखील आता सुरक्षीत नसल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे.लिल्हारे आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भरणाºया आठवडी बाजारातून पत्ता कोबी विकत घेतली. रात्री भाजी तयार करताना पत्ता कोबी विचित्र आढळली. कोबी पॉलीथीन युक्त असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी न खाताच फेकून दिली. याची तक्रार बाजीविक्रेत्याकडे केली.काही दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपवर केमिकलयुक्त गोबी हुबेहुब कशी तयार केली जाते.याचे एक व्हिडिओ सर्वत्र व्हॉयरल झाले होते. नेमकी तशी कोबी आमगाव येथील बाजारपेठेत आढळल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या प्रकरणाची अन्न औषध प्रशासन विभागाने चौकशी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.सदर कोबी बंगलोर येथून आयात केली जाते. पावसाळ्यात गावठी कोबीचे पिक घेतले जात नाही. भाजी बाजारात मिळणारी कोबी ही संकरीत असते. विविध जातीच्या बियाणातून कोबीची शेती केली जाते. ही कोबी केमिकल युक्त नसून हॅबरीट आहे.रमेश चोरवाडे, भाजी विक्रेते, आमगाव
आमगाव येथे केमिकलयुक्त कोबीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:20 IST