शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:45 IST

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री करण्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शासनाने सुध्दा कृषी केंद्राची तपासणी करुन कीटकनाशकांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची बघ्याची भूमिका : शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री करण्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शासनाने सुध्दा कृषी केंद्राची तपासणी करुन कीटकनाशकांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र जिल्हा कृषी विभागातर्फे अद्यापही शोध मोहीम सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कीटकनाशक फवारणीमुळे १५ ते २० शेतकºयांच्या मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शेतकºयांचीे ओरड वाढल्यानंतर प्रशासनाने कृषी केंद्राची तपासणी मोहीम सुरू केली. तसेच बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री होत आहे का? याची चाचपणी करण्याचे काम काही जिल्ह्यात कृषी विभागातर्फे सुरू आहे.मात्र गोंदिया जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला यासंबंधीचे आदेश अद्यापही न मिळाल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ जिल्ह्यातून बनावट कीटकनाशकांची विक्री केली जाते. ही बाब कृषी विभागाच्या अधिकाºयांना माहिती आहे.मात्र ते याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने अद्यापही जिल्ह्यातील कृषी केंद्राना भेटी देऊन बंदी असलेल्या कंपन्याच्या कीटकनाशकांची विक्री केली जात आहे का? याची चाचपणी केली नाही. त्यासाठी विशेष मोहीम देखील राबविण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.दरम्यान कोणत्या कंपनीच्या कीटकनाशकांवर बंदी आहे, याची माहिती प्रसिध्द केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात आहे.