शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:09 IST

दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे बाजारात आतापासूनच गर्दी बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देइलेक्ट्रॉनिक साहित्यांकडे कल : सोन्याचे आकर्षण मंदावले

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे बाजारात आतापासूनच गर्दी बघावयास मिळत आहे. दुकानांत खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. मात्र आता सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल असल्याचे चित्र आहे.महागाईने कळस गाठला असून यंदा निसर्गाच्या अवकृपेने शेतीही झाली नाही. परिणामी संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम व्यापारावरही काही प्रमाणात जाणवत आहे. गोंदिया येथील बाजारपेठेत गेल्या तीन-चार दिवसांपासून ग्राहकांची चांगलीच वर्दळ वाढली आहे. अशात सोनेही वधारलेले आहे. त्यातही एका तोळ्यात दागिना मिळत नसल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल आता कमी होत चालला आहे.दिवाळीत धनोत्रयोदशीच्या दिवशी लहान का नसो मात्र नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा चालत आली आहे. आजही या जुन्या परंपरेचे अनुकरण केले जात असून धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वजण एखाद्या वस्तूची हमखास खरेदी करतात. यात धनाढ्यांकडून सोन्याची खरेदी केली जात असल्यास मध्यमवर्गीयाकडूनही भांडे, वाहन किंवा अन्य गरजेच्या वस्तूची खरेदी केली जाते. आजघडीला मात्र मध्यमवर्गीयांचा कल इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आज दररोजच्या जीवनात उपयोगी पडत असतात त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे.ठरविलेली वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी पूर्वीपासून नियोजन केले जाते व ती वस्तू धनत्रयोदशीला खरेदी केली जाते. परिणामी चालत आलेल्या परंपरेनुसार धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढत आहे. मंगळवारी (दि.१७) धनत्रयोदशी येत असल्याने कित्येकांकडून आतापासूनच आवडत्या वस्तूची बुकींग केली जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी ती वस्तू घरी नेली जाणार आहे. त्यामुळे दुकानांत ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.फायनान्स सुविधा व आवाक्यातहीसोन्याच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त आहेत. यात मोबाईल, लॅपटॉप, फ्रीज, टिव्ही व अन्य साहीत्यांचा समावेश करता येईल. शिवाय हे साहीत्य खरेदी करण्यासाठी आजघडीला पूर्ण रक्कम देण्याचीही गरज नाही. या वस्तू आता फायनन्स होत असल्याने काही पैसे देऊन दिवाळीची खरेदी करता येते. शिवाय आपल्या घरात गरजेची वस्तू खरेदी करून होते.आॅनलाईन शॉपिंगची वाढली क्रेजसध्याच्या इंटरनेट युगात शेकडो आॅनलाईन शॉपींग साईट्स आहेत. कमी दरात व हजारो वस्तू एका क्लीकवर उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा कल आॅनलाईन शॉपींगकडे वाढत चालला आहे. घरबसल्या पाहिजे ती वस्तू उपलब्ध होत असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत.