शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:12 IST

दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे बाजारात आतापासूनच गर्दी बघावयास मिळत आहे. दुकानांत खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसत आहे.

ठळक मुद्देइलेक्ट्रॉनिक साहित्यांकडे कल : सोन्याचे आकर्षण मंदावले

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे बाजारात आतापासूनच गर्दी बघावयास मिळत आहे. दुकानांत खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. मात्र आता सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल असल्याचे चित्र आहे.महागाईने कळस गाठला असून यंदा दान पिक बाजारात आले नाही. परिणामी संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम व्यापारावरही काही प्रमाणात जाणवत आहे. गोंदिया येथील बाजारपेठेत गेल्या तीन-चार दिवसांपासून ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. अशात सोनेही वधारलेले आहे. त्यातही एका तोळ्यात दागिना मिळत नसल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल आता कमी होत चालला आहे.दिवाळीत धनोत्रयोदशीच्या दिवशी लहान का नसो मात्र नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा चालत आली आहे. आजही या जुन्या परंपरेचे अनुकरण केले जात असून धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वजण एखाद्या वस्तूची हमखास खरेदी करतात.यात धनाढ्यांकडून सोन्याची खरेदी केली जात असल्यास मध्यमवर्गीयाकडूनही भांडे, वाहन किंवा अन्य गरजेच्या वस्तूची खरेदी केली जाते. आजघडीला मात्र मध्यमवर्गीयांचा कल इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आज दररोजच्या जीवनात उपयोगी पडत असतात त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे. ठरविलेली वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी पूर्वीपासून नियोजन केले जाते व ती वस्तू धनत्रयोदशीला खरेदी केली जाते.परिणामी चालत आलेल्या परंपरेनुसार धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढत आहे. सोमवारी (दि.५) धनत्रयोदशी येत असल्याने कित्येकांकडून आतापासूनच आवडत्या वस्तूची बुकींग केली जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी ती वस्तू घरी नेली जाणार आहे. त्यामुळे दुकानांत ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.फायनान्स सुविधा व आवाक्यातहीसोन्याच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त आहेत. यात मोबाईल, लॅपटॉप, फ्रीज, टिव्ही व अन्य साहीत्यांचा समावेश करता येईल. शिवाय हे साहीत्य खरेदी करण्यासाठी आजघडीला पूर्ण रक्कम देण्याचीही गरज नाही. या वस्तू आता फायनन्स होत असल्याने काही पैसे देऊन दिवाळीची खरेदी करता येते. शिवाय आपल्या घरात गरजेची वस्तू खरेदी करून होते.आॅनलाईन शॉपिंगची वाढली क्रेजसध्याच्या इंटरनेट युगात शेकडो आॅनलाईन शॉपींग साईट्स आहेत. कमी दरात व हजारो वस्तू एका क्लीकवर उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा कल आॅनलाईन शॉपींगकडे वाढत चालला आहे. घरबसल्या पाहिजे ती वस्तू उपलब्ध होत असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत.

टॅग्स :MarketबाजारDiwaliदिवाळी