शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

साहेब, बकी गेट सुरू करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:09 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आता सडक अर्जुनी तालुक्यासाठी वरदान ठरला आहे. सडक-अर्जुनीपासून अवघ्या चार किमी अंतरावर बकी गेट आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून बंदच : सर्वाधिक उत्पन्न देणारा गेट, पर्यटकांना होते २२ किमीचा फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आता सडक अर्जुनी तालुक्यासाठी वरदान ठरला आहे. सडक-अर्जुनीपासून अवघ्या चार किमी अंतरावर बकी गेट आहे. मागील एक वर्षापूर्वी या बकी गेटवरुन हजारो पर्यटक पर्यटनासाठी जात होते. मात्र वातानुकूलित खोलीत बसून विविध अटी व नियम लादणाºया अधिकाºयांमुळे मागील वर्षापासून बकी गेट बंद करण्यात आल्याचा फतवा काढण्यात आला.बकी गेट इतर गेटपेक्षा जास्त उत्पादन देणारा गेट म्हणून मोठा आहे. तालुक्यातील कोसबी गावाजवळील बकी गेटमधून पर्यटनासाठी आत जंगलात गेले तर पर्यटकांना तेलनभरी, जांभुळझरी, कालीमाटी, कुरण, मोर्नाझरी, बदबदाझरी, बोदराईझरी व झनकारगोंदी तलाव असे मोठे ठिकाण पहावयास मिळतात. बकी गेटच्या पुढे जाताना झलकारगोंदी तलाव आहे. या तलावाचे बाजूला झुडपे जंगल नसल्यामुळे वनातील प्राणी पाहून ओळखण्याची संधी उपलब्ध होते. झनकारगोंदी तलाव परिसरात सांबर, हरीण, बिबट, अस्वल, रानकुत्रे, वाघ, रानगवे, रानडुकरे, तडस, रानमांजर आदी प्राणी प्रामुख्याने पहावयास मिळतात.गेल्या दोन वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या तीन गावांचे पुनर्वसन सौंदड गावाजवळ श्रीरामनगर या नावाने करण्यात आले आहे. सदर तिन्ही गावांचे पुनर्वसन झाल्याने त्या ठिकाणच्या घरांचे व त्यांच्या शेतीचे सपाटीकरण करण्यात आले. त्या ठिकाणी गवताचे मोठे कुरण तयार झाल्याची चर्चा आहे. त्या पुनर्वसित जागेच्या परिसरात प्राण्यांना खाण्यासाठी चाºयाची मुबलक प्रमाणात सोय झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांच्या वाढीचे दुष्परिणाम व्याघ्रप्रकल्पाजवळील कोकणा-जमि., कनेरी, मनेरी, खोबा, कोसमघाट, बकी, मेंडकी, कोलारगाव, कोसबी आदी गावातील शेतकºयांवर होताना दिसत आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या लगत शेतपिकांवर जास्त ताव मारतात. हाती आलेल्या पिकांची मोठीच नासाडी करतात. त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. बंदोबस्त न केल्यास गरीब शेतकºयांच्या हाती आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहे.गेल्या वर्षी बकी गेट बंद ठेवण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते खराब असल्यामुळे पर्यटकांच्या वाहनांना जाण्यासाठी त्रास होत असल्याची समस्या पुढे करुन बकी गेट बंद करण्यात आले होते. वनातील मोर्चा कुटी जवळील पूल नसल्यामुळे पर्यटकांना वाहणाºया नाल्याच्या पाण्यातून गाडी काढावी लागत होती. मोर्चा कुटी जवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. व्याघ्र प्रकल्पातील खडीकरणाच्या रस्त्यावर गिट्टी बाहेर निघाल्याची माहिती आहे. पण वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाºयांनी मनावर घेतले तर दोन दिवसांत मुरमाचा लेप लावून पूर्ण करता येतो. पण कोणताही अधिकारी मनाला लावून घेत नाही, हे विशेष.गाईड्सवर बेरोजगारीची कुºहाडपर्यटकांच्या पर्यटनामुळे बकी गेट येथील नऊ गाईड परिवारांची आर्थिक समस्या दूर झाली होती. पण बकी गेट बंद असल्यामुळे या गाईड लोकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. पर्यटनासाठी येणाºया देवरी, गोंदिया, सडक-अर्जुनी, रायपूर, चिचगड, गोरेगाव आदी शहरांतील पर्यटकांना बकी गेट सोयीचे आहे. राष्टÑीय महामार्ग-६ वरुन जाणाºया पर्यटकांना बकी गेट फक्त तीन किमी अंतरावर आहे.कोहमारा येथील हॉटेल व्यवसाय ठप्पबकी गेट बंद असल्यामुळे आता या पर्यटकांना नवेगावबांधला २२ किमी अंतर जास्त जावून पर्यटकांना आनंद घ्यावा लागणार आहे. गेल्या वर्षी कोहमारा मार्गे बकी गेटला जाणाºया पर्यटकांमुळे कोहमारा येथील हॉटेलवाल्या व्यावसायिकांचे व्यवसाय चालत होते. आता एकही पर्यटक कोहमारा चौकात थांबत नाही. त्यामुळे कोहमारा येथील व्यावसायिकांचे धंदे चौपट झाले आहेत. वन्यजीव विभागाच्या आदेशाप्रमाणे दरवर्षी १ आॅक्टोबरपासून पर्यटकांसाठी गेट सुरू केले जातात. पण अजूनपर्यंत यावर्षी बकी गेट सुरू झाले नाही. त्या वरिष्ठ अधिकाºयांच्या पत्रावरून गेट सुरु होण्याचे पत्र येईल, याची खात्री नसल्याची माहिती पुढे आली आहे.बंद गेटसमोर शुल्क दर्शविणारा फलकबकी गेट जवळ वन्यजीव विभागाने प्रवेश शुल्काचा बोर्ड लावून ठेवला आहे. त्यात भारतीय नागरिक पुरुष ३० रुपये, स्त्री २० रुपये, ० ते १२ वर्षांची मुले-मुली नि:शुल्क, ५ ते १२ वर्षे मुले-मुली १५ रुपये प्रती व्यक्ती, कॅमेरा २५०, साधा कॅमेरा १०० रूपये तर वाहणांसाठी शुल्क चारचाकी, बस, ट्रक १५० रुपये, गाईडकरिता प्रती फेरी २५० रुपये असल्याची माहितीचा फलक लावला आहे. मागील वर्षी बकी गेट बंद राहिल्याने शासनाचा आर्थिक नुकसान झाला आहे. त्याच बरोबर पर्यटकांना त्रास होवून नवेगावबांधमार्गे फेºयाने पर्यटनासाठी जावे लागत आहे.वरिष्ठ अधिकाºयांचे गेट सुरु करण्यासंबंधी सूचना नसल्यामुळे बकी गेट बंद ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांची सूचना येताच बकी गेट सुरू केल्या जाईल.-प्रशांत पाटीलवनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव, नवेगावबांध