गोंदिया : लोकमत सखी मंच वसंतनगर व जगदंबा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शीतला माता मंदिराच्या प्रांगणात मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा व महाराष्ट्रीयन वेशभुषेत गुढी सजवा स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत सहा व गुढी सजवा स्पर्धेत नऊ स्पर्धक सहभागी झाले होते.अतिथी म्हणून भैरवी देशपांडे, हर्षद चुटे, भूमी वतवानी व लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका दीपा भौमिक प्रामुख्याने उपस्थित होते. पुष्पगुच्छ देवून अतिथींचा स्वागत करण्यात आला. स्पर्धेसाठी निर्णायक म्हणून भैरवी देशपांडे व भूमी वतवानी यांनी काम पाहिले. गुढी सजवा स्पर्धेत सिंधू ढबाले, संध्या यादव, कांता चुटे, डिंपल रेहेले, धनश्री शहारे व रेवा बांगरे सहभागी झाले होते. यात डिंपल रहेले प्रथम, संध्या यादव द्वितीय व रेवा बांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. महाराष्ट्रीयन वेशभुषा स्पर्धेत (नऊवारी साडी घालून) महिलांनी गुढींची सजावट केली. निरीक्षणानंतर द्वितीय चरणात गुढीपाडव्यावर विविध प्रश्न विचारून स्पर्धकांचा क्रम ठरविण्यात आला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची बेंदवारने मिळविला. तर प्रोत्साहन पुरस्कार खुशबू मांडवे, नितू बहादूर, कोमल मांडवे व डिंपी गौर यांना देण्यात आला. याप्रसंगी महिला भजन मंडळाने देवीचे भजन सादर करून सर्वांचे मन मोहून घेतले. यात सरोज मडावी, सुश्री साकुरे, सीमा गौर, ठाकूर व सुरेखा गौर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार माजी नगरसेविका नंदा राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी दीपा भौमिक, लता कठाने, धनश्री चुटे, देवकी बघेले, सावरकर, पडसीकर, अर्चना ठाकूर, अशोक मांडवे, बाला पारधी, धनराज पाथोडे, सोनू मांडवे व लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
गुढी सजवा स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: March 26, 2015 01:14 IST