शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

‘आदर्श’ प्राथमिक आरोग्य केंद्राची गाथा पुस्तकबंद

By admin | Updated: December 30, 2014 23:37 IST

तालुक्यातील कावराबांधच्या आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्राची महती राज्यस्तरावर गेली आहे. विविध पुरस्कार पटकावलेल्या या आरोग्य केंद्राची यशोगाथा वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक

सालेकसा : तालुक्यातील कावराबांधच्या आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्राची महती राज्यस्तरावर गेली आहे. विविध पुरस्कार पटकावलेल्या या आरोग्य केंद्राची यशोगाथा वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी तयार केली. त्या माहिती पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले. या केंद्रासाठी केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी तसेच आरोग्य विभागालासुध्दा ही माहिती उपयोगी पडावी या दृष्टीकोणातून प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. डॉ. विवेक अनंतवार यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या एका टोकावरील गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये असलेल्या सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध क्षेत्रातील जनतेला सर्व प्रकारच्या उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, आदिवासी क्षेत्रात जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा तसेच रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध होत आहे. आरोग्य संस्थेत १०० टक्के प्रसुती होत आहे. शासनाच्या विविध उपक्रम तसेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व शासनाच्या येणाऱ्या विविध योजना १०० टक्के यशस्वीपणे राबवित आहे. यांच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे डॉ.आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय वैयक्तिक प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रा. आ. केंद्राला आदर्श करण्याचे श्रेय येथील सर्व कर्मचारी, अर्धवेळ स्त्री परिचर, परिचर यांना आहे. त्यांनी केलेले अहोरात्र परिश्रम, मेहनत, चिकाटी, मनापासून काम करण्याची इच्छा व जिद्द यामुळेच आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ, सुंदर व रमणीय झालेला असून या प्रा.आ. केंद्राने गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक मिळवला आहे. सहकारी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षिका, आंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता यांच्या कार्य तत्परतेमुळे शासकीय आरोग्य सेवेचे उद्दीष्ट्ये अविरत पूर्ण होत आहे. माहिती पुस्तिकेच्या विमोचनप्रसंगी आ. डॉ. सुरेश माने, विनोद इटकलेवार, डॉ.पंकज कन्नमवार, जयंत अनंतवार, आर.एन. श्रीवास व इतर मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)