नवीन उपक्रम : युवा सेना व विद्यार्थी सेनेचा संयुक्त उपक्रमगोंदिया : शहरातील अनेक मार्गांवर मोकाट गाई फिरत असतात. तसेच रस्त्याच्या मधोमत बसून ही जनावरे रहदारीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अपघाताची नेहमीच शक्यता असते व अनेकदा अपघातात जीवित हानीसुद्धा झाली आहे. ही बाब लक्षात घेवून युवा सेना व विद्यार्थी सेनेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अशा बेवासर गार्इंच्या शिंगांना भगवे रेडीयम लावण्यात आले आहे.भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक प्रशांत कोरे, युवा सेनेचे उपजिल्हा संघटक हिमांशू कुथे व युवा सेनेचे तालुका युवाअधिकारी अभय मानकर यांच्या नेतृत्वात अपघातापासून वाचण्यासाठी रस्त्यावर फिरणारे व बसलेल्या जनावरांच्या सिंगांना भगवा स्टीकर लावण्याची दोन दिवसीय मोहीम राबविण्यात आली. यात बहुतांश गार्इंचा समावेश आहे. आमगाव मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाटवरी कटंगी नाका, पाल चौक, कुडवा नाका, टी पॉर्इंट तसेच शहरातील प्रमुख रस्ते ज्यावर गार्इंचा कळप मोठ्या प्रमाणात राहते अशा रस्त्यांवरील गार्इंच्या शिंगांना भगवा रेडीयम स्टीकर लावण्यात आले. भगवा रेडीयममुळे वाहनांचा प्रकाश पडताच जनावर समोर असल्याचा संकेत वाहन चालकांना मिळेल व अपघात टळेल.याप्रसंगी विकास नागरिकर, राहुल नागपुरे, भुपेंद्र नाकाडे, गोविंदा मिश्रा, मनोज बुधवानी, खुशाल निंबाळकर, संदेश निंबाळकर, विनायक मेंढे, अमन हरिणखेडे, सोहन शेंद्रे, अनूप माणिकपुरी, योगेश बेलगे, रितेश चोरनेले, प्रशांत यादव, युवा सेना व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बेवारस गार्इंच्या शिंगांना लावले भगवे रेडीयम
By admin | Updated: August 29, 2016 00:11 IST