शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निवासस्थानांच्या दुर्दशेने पोलीस कर्मचारी त्रस्त

By admin | Updated: August 28, 2014 23:52 IST

तालुक्यातील डूग्गीपार पोलीसांच्या निवासस्थांची वाताहत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वात जुने पोलीस स्टेशन म्हणून डूग्गीपारची ओळख आहे. डूग्गीपार पोलीस कर्मचाऱ्यांना

सडक/अर्जुनी : तालुक्यातील डूग्गीपार पोलीसांच्या निवासस्थांची वाताहत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वात जुने पोलीस स्टेशन म्हणून डूग्गीपारची ओळख आहे. डूग्गीपार पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासाची व्यवस्था शासनाने केली आहे. मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाच्या नियोजना अभावी सदर निवासस्थाने भूतबंगले होण्याच्या मार्गावर आहे. मागील २६ वर्षापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ९ निवासस्थाने तयार करण्यात आली. यानंतर काही वर्षांनंतर दोन मजली सिमेंट कॉकेंटच्या दहा निवासास्थाने लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आली. त ेही निवासस्थाने फारच कमी जागेत तयार करण्यात आले आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आई-वडील राहण्यासाठी आल्यास मोठी अडचण होते. जून्या व नवीन निवासस्थानाची वाताहत झाल्यामुळे त्या ठिकाणी एकही कर्मचारी राहत नाही. आता संपूर्ण निवासस्थाने कुत्र्यांचे व जनावरांचे आश्रयस्थआन झाले आहे. त्या ठिकाणी पाणी विजेची पूरेशी सोय नसल्यामुळे तिथे कोणीच राहात नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभ तयार करण्यात आले. मात्र मोटारपंप नसल्यामुळे त्या मोटार पंपाव्दारे पाणी जलकुंभात चढत नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत होते. निवासस्थानाला लागून गवताचे मोठे-मोठे झुडूप वाढले आहे. निवासस्थानाकडे जाण्याकरीता डांबरीकरण नसल्यामुळे त्यांनाही चिखलातूनच जावे लागत होते. गेल्या २६ वर्षापूर्वी बांधकाम आलेल्या निवासस्थानांना काही ठिकाणी भगदळ पडली आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक वस्तु चोरीला जाण्याची शक्यता आहे. सध्या डूग्गीपार पोलीस स्टेशनचे कर्मचारी कोहमारा, सडक/अर्जुनी, डूग्गीपार येथे भा्याने राहतात. लोकप्रतिधी व जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)