शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुने मार्गी लागेना अन् नवीनसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:21 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही यातील घोळ संपला नसून अद्यापही राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीसपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफीचा घोळ कायम : जून २०१७ पर्यंतच्या मागविल्या याद्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही यातील घोळ संपला नसून अद्यापही राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीसपासून वंचित आहेत. तर आता राज्य सरकारने जून २०१७ पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या याद्या बँका आणि उपनिबंधक कार्यालयाकडून मागविल्या आहे. त्यामुळे जुने मार्गी लागेना अन नवीनसाठी धावपळ अशी स्थिती निर्माण झाली आहे.राज्यात मागील वर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीनंतर शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना सवलत दिली. नियमित कर्जफेड करणाºयांना २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्यातील लाखो शेतकरी पात्र ठरले.शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागवून त्यांच्या अर्जाची पडताळणी करुन कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली. मात्र यातही मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाला. कर्जमाफीच्या घोषणेला वर्षभराचा कालावधी लोटूनही पात्र ठरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफीची दहावी यादी न आल्याने एकट्या गोंदिया जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. तर हीच स्थिती राज्यातील इतर जिल्ह्यात आहे. जुने कर्जमाफ न झाल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.काही शेतकऱ्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून रोवणीची कामे पूर्ण केली. मात्र यानंतरही महाआॅनलाईनकडून बँकाना दहावी यादी प्राप्त झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी प्राप्त न झाल्याने उपनिबंधक कार्यालय आणि बँकाचे अधिकारी व कर्मचारी त्रस्त आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जुन्या याद्या मार्गी लावण्याची गरज असताना आता शासनाने दोन दिवसांपूर्वीच सर्व जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयाला पत्र देवून जून २०१७ पर्यंत पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. त्यामुळे बँका आणि उपनिबंधक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवरील ताण अधिक वाढला असून आधी जुन्या याद्या मार्गी लावायच्या की नवीन माहिती पाठवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.याद्यांना विलंब करण्याचे धोरणकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही महाआॅनलाईनने बँका आणि उपनिबंधक कार्यालयाला उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी मागील तीन महिन्यांपासून बँकांच्या पायऱ्या झिजवित आहे. लवकरात लवकर ग्रीन याद्या पाठविण्याची गरज असताना याला पुन्हा विलंब केला जात असल्याने यामागे नेमका हेतू काय असा सवाल उपस्थित केला.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी