शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नियम 40 किलोग्रॅमचा, खरेदी 42 किलोंनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

सध्या शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बीतील धान खरेदी सुरू आहे. रब्बीसाठी धानखरेदीची मर्यादा केंद्र सरकारने ठरवून दिली असून, यामुळे ७० सहकारी संस्थांनी धान खरेदीला सुरुवातच केलेली नाही; तर सध्या स्थितीत ४८ धान खरेदी केंद्र  सुरू झाले असृून, या केंद्रावरून १ लाख ३० हजार क्विंटलपर्यंत धान खरेदी झाली आहे. गोंदिया तालुक्यातील ४, आमगाव तालुक्यातील २ आणि तिरोडा तालुक्यातील १ केंद्राची धान खरेदीची मर्यादाही पूर्ण झाली असून, या केंद्रावर खरेदी बंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर कट्ट्यांमध्ये धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करताना प्रतिकट्टा ४० किलो ६०० ग्रॅम धान घेण्याचा नियम असताना खरेदी केंद्रावर मात्र कट्ट्यामध्ये ४२ किलो धान शेतकऱ्यांकडून घेतले जात  असल्याने शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ३ ते ४ किलो अतिरिक्त जात आहे. पण या सर्व प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बीतील धान खरेदी सुरू आहे. रब्बीसाठी धानखरेदीची मर्यादा केंद्र सरकारने ठरवून दिली असून, यामुळे ७० सहकारी संस्थांनी धान खरेदीला सुरुवातच केलेली नाही; तर सध्या स्थितीत ४८ धान खरेदी केंद्र  सुरू झाले असृून, या केंद्रावरून १ लाख ३० हजार क्विंटलपर्यंत धान खरेदी झाली आहे. गोंदिया तालुक्यातील ४, आमगाव तालुक्यातील २ आणि तिरोडा तालुक्यातील १ केंद्राची धान खरेदीची मर्यादाही पूर्ण झाली असून, या केंद्रावर खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र यातही गौडबंगाल असून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान आधीच खरेदी करून चार-पाच दिवसांतच खरेदी पूर्ण झाल्याचे दाखविल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर प्रत्यक्षात धान खरेदी झाली अथवा  नाही, याची चाचपणी करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याची माहिती आहे. खरेदी सुरू असलेल्या केंद्रांना भेट दिल्यास बरेच वास्तविक चित्र पुढे येण्याची शक्यता आहे. खरेदी केंद्रावर नियमानुसार धानाचे वजन न घेता अतिरिक्त धान  घेतले जात आहे; तर १ क्विंटल धानासाठी शेतकऱ्यांना ६० रुपयांचा बारदाना लागत आहे. शासनाकडून खरेदी केंद्रावरील हमालांना प्रतिक्विंटल १० रुपये ७५ पैसे हमाली दिली जाते. मात्र यानंतरही केंद्रावर शेतकऱ्यांकडून हमालीचे पाच रुपये घेतले जात आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे कुणाचेच लक्ष नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

मर्यादा वाढण्याची शक्यता कमीच - पावसाळा तोंडावर असून रब्बीतील शासकीय धान खरेदीची मुदत ही ३० जूनपर्यंतच असते; पण सध्याची खरेदीची स्थिती  पाहता पुन्हा पंधरा दिवस व्यवस्थित धान खरेदी होण्याची शक्यता आहे; तर केंद्र सरकारने अद्यापही धान खरेदीची मर्यादा वाढवून दिलेली नाही. सध्या चित्र पाहता ती वाढवून मिळण्याची शक्यताही कमीच असल्याचे बोलले जाते. रब्बीचे लागवड क्षेत्र कमी दाखविल्याने घोळ - जिल्ह्यातील रब्बीचे लागवड क्षेत्र हे. ६८ हजार १२० हेक्टर असताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि संबंधित यंत्रणेकडून कमी लागवड क्षेत्राची माहिती पाठविण्यात आल्याने धान खरेदीची मर्यादा कमी झाली. मात्र सुधारित आकडेवारी नुकतीच पाठविण्यात आली असून खरेदीची मर्यादा वाढवून मिळेल, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड