शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही डोसचा नियम ठरला नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

शासनाकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक नागरिकांनी कोरोना लस घेतलेली नाही. तर, कित्येकांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवला आहे. अशात त्यांच्यापासून संपर्कात येणारी व्यक्ती बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजविली असल्याने शासनाने गर्दी ठिकाणांवर व शासकीय कार्यालयांत दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेशाचा नियम केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  लस घेतलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. अशात सर्वच नागरिकांनी कोरोनाची लस घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होणार नाही व पुढेही कोरोनाला आपले पाय पसरता येणार नाही. यामुळेच शासनाकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक नागरिकांनी कोरोना लस घेतलेली नाही. तर, कित्येकांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवला आहे. अशात त्यांच्यापासून संपर्कात येणारी व्यक्ती बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजविली असल्याने शासनाने गर्दी ठिकाणांवर व शासकीय कार्यालयांत दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेशाचा नियम केला आहे. या नियमाची मोठ्या शहरांत अंमलबजावणी होत आहे. मात्र, गोंदिया शहरात जिल्हा परिषद कार्यालय सोडून हा नियम नावापुरताच आहे. शहरात ना बाजारात ना शासकीय कार्यालयांत कोठेही लसीचे दोन्ही डोस घेतल्याबाबत विचारणा करणारा कुणीच नाही. 

फक्त जिल्हा परिषद कार्यालयातच विचारणा - येथील जिल्हा परिषद कार्यालयातच या नियमाची अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसते. कार्यालयातील प्रवेशद्वारातच हजर असलेला कर्मचारी येणाऱ्या नागरिकांना दोन्ही डोसबाबत विचारणा करतो. तसेच तोंडावर मास्क लावण्यास सांगत असून सॅनिटायजरही देतो. याशिवाय अन्य कोणत्याही कार्यालयात, बस्थानक, रेल्वेस्थानक, बाजार आदी ठिकाणी विचारणा करणार कुणीच दिसत नाही. 

कारवाई करायची कोणी? - कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना जिल्हा प्रशासनाकडून तहसील कार्यालय, तसेच नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकांसोबतच शहर पोलीस, तसेच वाहतूक पोलीस सुद्धा मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईत करीत होते. बाजारातील दुकानांमध्ये गर्दी होत असल्यास कारवाई केली जात होती. आता मात्र अशाप्रकारची कारवाई करणारा कुणीच नाही. ना पोलीस विभागा, ना अन्य पथक.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस