शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल; राज्यभरातील ६६ टक्के मुलांचे प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 01:20 IST

आरटीई प्रवेशाची पहिली फेरी पार पडली असून गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गोंदियामधील ७८.९८ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.

गोंदिया : आरटीई प्रवेशाची पहिली फेरी पार पडली असून गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गोंदियामधील ७८.९८ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.राज्यातील ३५ जिल्ह्यातील ९ हजार १९५ शाळांमध्ये एक लाख १६ हजार ७७९ जागा आरटीईसाठी राखीव करण्यात आल्या आहे. या जागांसाठी दोन लाख, ४४ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या सोडतीनंतर ४४ हजार, ९८३ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी प्रवेश घेतले.गोंदिया जिल्ह्याच्या १४१ शाळांमध्ये १०४३ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी २ हजार ७३१ अर्ज आले. यातील ६०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्या पाठोपाठ पालघर ७५.७७ टक्के धुळे ७४.९४, सोलापूर ७४.८६, सातारा ७३.६३, वर्धा ७२.९०, अहमदनगर ७२.६२, अकोला ७२.४९, भंडारा ६९.७५, बुलढाणा ६९.४८, मुंबई ६९.०४, नाशिक ६८.९२, पुणे ६८.६४, जलगाव ६८.५४, रायगड ६८.३६, अमरावती ६७.५२, नांदेड ६७.०५, जालना ६६.८०, बिड ६६.७३, ठाणे ६५.३५, नागपूर ६५.१५, चंद्रपूर ६४.०४, रत्नागिरी ६३.३३, लातूर ६३.१८, औरंगाबाद ६१.४७, उस्मानाबाद ६१.१५, यवतमाळ ६०.७३, वाशिम ६०.०४, मुंबई ५९.३४, परभणी ५९.०९, गडचिरोली ५८.६३, सिंधुदुर्ग ५६.३८, नंदूरबार ५५.७१, हिंगोली ५४.४६, कोल्हापूर ५० आणि सांगली जिल्ह्यात ४५.४२ टक्के बालकांनी आतापर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेश घेतले आहेत.६६.४४ टक्के प्रवेशपहिल्या फेरीत राज्यातील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. परंतु त्यातील ४४ हजार ९८३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला आहे. राज्यातील ६६.४४ टक्के बालकांचे प्रवेश झाले आहेत.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा