शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्त्यातून ३४.३२ कोटींची रॉयल्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 01:52 IST

सन २०१७ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ समूह घटकांच्या एकूण ६२ तेंदूपानांच्या घटकांसाठी तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे

२०१७ चा हंगाम : ४० हजार ५९५ प्रमाण गोणींचे घोषित उत्पादन देवानंद शहारे  गोंदिया सन २०१७ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ समूह घटकांच्या एकूण ६२ तेंदूपानांच्या घटकांसाठी तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे करण्यासाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१७ च्या यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी ४० हजार ५९५ प्रमाण गोणींचे उद्दिष्ट असून, ही उद्दिष्टपूर्ती झाल्यास ३४ कोटी ३२ लाख ९१ हजार ८७२ रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात तेंदूपाने संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात होते. तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांच्या कामावर गदा येवू नये यासाठी शासनसुद्धा प्रयत्नशील असते. जंगलात वनवा लागू नये, तेंदूपाने नष्ट होवू नये यासाठी वन विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येते. यावर्षीसुद्धा गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, तिरोडा, कोसमतोंडी, सडक-अर्जुनी, कोहमारा, सौंदड, शेरपार, देवरी, भागी-मुल्ला, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, चिचगड अशा एकूण २९ बिटमध्ये तेंदूपत्ता संकलनाची कामे केली जाणार आहेत. तेंदूपाने संकलन करणे, पुडे सुकविणे, पाणी शिंपणे, बोद भराई करणे आदी संपूर्ण कामासाठी मजुरांना मजुरी परवाना धारकांच्यामार्फत वितरित करण्यात येते. त्यामुळे मजूर कुटुंबांना उन्हाळ्यात एक मोठा आर्थिक आधार प्राप्त होतो. तेंदूपाने घटक विक्रीपासून मिळालेल्या महसुलातून शासकीय खर्च वजा करून शासनातर्फे मजुरांना शिल्लक रक्कम बोनस स्वरूपात वितरित करण्याचेही धोरण आहे. मागील वर्षी, सन २०१६ तेंदूपाने हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम गोंदिया विभागातील क्षेत्रीय कर्मचारी व परवानाधारक यांनी त्यांच्या स्तरावर संकलनाच्या कामाचे केलेल्या उत्तम नियोजनामुळे उत्कृष्टपणे झाले. तसेच त्यावर्षी गोंदिया वन विभागासाठी नेमून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास पूर्तता झाली. उद्दिष्ट होते १२.७८ कोटींचे व प्रत्यक्ष झाले १२.६२ कोटींचे. विशेष म्हणजे तेंदूपाने संकलन कामामुळे ४० हजारांच्या वर मजुरांना उन्हाळ्याच्या कालावधीत रोजगार प्राप्त झाला होता. सदर हंगाम २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश निघाले होते. मात्र अनेक बिटमध्ये प्रत्यक्ष ३० एप्रिल व २ मेपासून तेंदूपाने तोडणीला सुरूवात झाली होती. तो हंगात ५ जूनपर्यंत सुरू होता. आता यावर्षी सन २०१७ चा तेंदू हंगामसुद्धा एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. काही मजुरांची बँकेत खाती नसतात. त्यामुळे त्यांचे बोनस उर्वरित राहते. तरी मजुरांनी आपल्या नावे बँक खाते उघडावे व त्याबाबत माहिती परिक्षेत्र कार्यालयात द्यावी, असे आवाहन गोंदिया वन विभागातर्फे करण्यात आले आहे. २०१७ च्या हंगामात सर्वाधिक रॉयल्टी तेंदू हंगामाबाबत मागील चार वर्षांच्या रॉयल्टीवर नजर घातली असता यावर्षीच्या हंगामात सर्वाधित रॉयल्टी मिळेल. सन २०१३ मध्ये सहा कोटी १७ लाख ४९ हजार ७६६ रूपये रॉयल्टी, सन २०१४ मध्ये सहा कोटी ७८ लाख ५२ हजार १७६ रूपये रॉयल्टी, सन २०१५ मध्ये नऊ कोटी २३ लाख ३७ हजार ७८२ रूपयांची रॉयल्टी व मागील वर्षी सन २०१६ च्या तेंदू हंगामात एकूण १२ कोटी ६२ लाख २० हजार ८५२ रूपयांची रॉयल्टी उपलब्ध झाली होती. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट रॉयल्टी यावर्षी सन २०१७ च्या हंगामात मिळणार आहे. ही रॉयल्टी रक्कम ३४ कोटी ३२ लाख ९१ हजार ८७२ एवढी आहे. उद्दिष्टपूर्तीच्या जवळपास मजल तेंदूपत्ता संकलनासाठी सन २०१५ च्या हंगामात ४६ हजार प्रमाण गोणींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्या हंगामात ४० हजार ९३६ प्रमाण गोणी झाल्याने ८८ टक्केच उद्दिष्टपूर्ती झाली होती. त्याद्वारे शासनाला ९ कोटी २३ लाख ३६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षी सन २०१६ मध्ये तेंदूपाने संकलनापेक्षा मजुरांनी रोजगार हमीच्या कामांना अधिक पसंती दिली होती. तरीसुद्धा १२.७८ कोटींचे उद्दिष्ट असताना १२.६२ कोटींचा महसूल उपलब्ध झाला.