शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बचत बँकेत २५ हजार रुपये

By admin | Updated: September 28, 2015 02:07 IST

आजघडीला खासगी शिक्षण संस्थांचा पसारा पाहू जाता, जिल्हा परिषदेच्या शाळा बऱ्याच मागे पडल्याचे बोलल्या जाते.

महालगावची जि.प. शाळा : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ध्येयवेड्या शिक्षकांची धडपडअमरचंद ठवरे बोंडगावदेवीआजघडीला खासगी शिक्षण संस्थांचा पसारा पाहू जाता, जिल्हा परिषदेच्या शाळा बऱ्याच मागे पडल्याचे बोलल्या जाते. ‘झोलबा पाटला’चे विद्यामंदिर शैक्षणिक प्रगतीमध्ये खासगी शाळांच्या तुलनेत उणे दिसत असल्याची भावना जणमानसात रुजली असली तरी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महालगाव या आदिवासी गावातील दोन शिक्षकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून सुसंस्कृत व शिस्तीचे धडे देणारे एक विद्यामंदिरच उभे केल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना वाईट सवयी लागू नयेत, त्यांना काटकसर व बचतीची सवय लागावी म्हणून दोन वर्षापूर्वी विद्यार्थी बचत बँक सुरू करण्यात आली. आज त्या बँकेत शाळेतील ४७ विद्यार्थ्यांचे २५ हजार रुपये जमा आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा हाच त्या शिक्षकांचा ध्यास असल्याचे शाळेच्या परिसरावरुन दिसत आहे.तालुक्यापासून १५ कि.मी. अंतरावरील ५५० लोकवस्तीचे महालगाव. या गावात ८५ टक्के अनुसूचित जमाती व १५ टक्के अनुसूचित जातीचा समुदाय आहे. काही मुले आश्रमशाळेत शिकायला जायची. १९७८ मध्ये सुरू झालेल्या महालगावच्या जि.प. प्राथमिक शाळेत सुरुवातीच्या काळात मोजकेच विद्यार्थी दाखल व्हायचे. २०११ मध्ये मुख्याध्यापक म्हणून हरेंद्र मेश्राम व सहायक शिक्षक म्हणून राजेश मरगडे या नव्या दमाच्या युवा जोडीने शाळेची भिस्त सांभाळली. आदिवासी समाजातील मुलांना चांगले संस्कारीत घडवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा चंगच त्या दोन शिक्षकांनी बांधल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन प्रकर्षाने जाणवत आहे. शाळेतील वर्ग १ ते ४ या वर्गात अनु. जमातीचे ४२ व अनुसूचित जातीचे ५ असे ४७ विद्यार्थी विद्यार्जन करीत आहे. विद्यार्थ्यांना काटकसर करण्याची प्रेरणा व्हावी त्याबरोबरच बचतीची सवय लागावी या भावनेने डिसेंबर २०१३ मध्ये शाळेत विद्यार्थी बचत बँकेची सुरुवात करण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँक सुरू झाल्याने विद्यार्थी एकदा वर्गात आले की शाळेच्या आवाराबाहेर खाऊ घेण्यासाठी फिरताना दिसत नाही. विद्यार्थ्यांनी बचत केलेल्या पैशांमधून तसेच आलेल्या व्याजामधून नोटबूक, पेन्सील, खोडरबर, शार्पनर, पेन, स्कुल बॅग आदी शालेय साहित्य किफायत भावात सर्व विद्यार्थ्यांना शाळेमधेच उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमाने पालकवर्गाची एक जबाबदारी आपोआपच पूर्ण केली जाते. लहान वयातील विद्यार्थ्यांंना आजची बचतीची सवय भविष्यात फलदायी ठरणार असल्याने पालकांचे सुद्धा या योजनेला पाठबळ मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. मुलांना सुसंस्काराचे डोज पाजणाऱ्या दोन शिक्षकांच्या कार्यप्रणालीने शाळेच्या परिसरात खाऊचे दुकान दिसत नाही. १७ पालकांचा सहभाग असलेली शाळा व्यवस्थापन समिती निश्चितपणे जागरुक असून नियमित बैठकीला आवर्जुन उपस्थित राहतात. शाळेच्या विकासासह शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी समिती तसेच संपूर्ण गावकरी सजग असून शाळेच्या कामासाठी धावून येत असल्याचे सांगितले गेले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतूक होण्याच्या हेतूने वर्षातून एकदा सांस्कृतिक महोत्सव राबविल्या जातो. शाळेच्या आवारात परसबाग लावून मुळा, गाजर, रताळे, वांगे, टमाटर, पालकभाजी, मेथी, कोथींबीर ईत्यादी हिरवा भाजीपाला काढून पोषण आहारात त्याचा नित्यनेम उपयोग केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक जीवनसत्यासह पोषक आहार मिळण्यात मदत होते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होण्याच्या हेतूने दोन्ही शिक्षक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कोणतीही कसर सोडत नाही. पुढील सत्रासाठी भरतीपात्र बालकांसाठी नियमित शिकवणी वर्ग सुरू आहे. एक पदवीधर महिला भरतीपात्र विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, इंग्रजी, गणित, मराठी विषयाची ओळख करून देण्याचा उपक्रम गावकऱ्यांच्या सहकार्याने शिक्षक करीत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो. माझी शाळा आमचे सर्वस्व आहे ही भावना अंगीकारून दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसते.