शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

सडलेल्या धानामुळे आले विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

खरीप हंगाम २०२०-२१ या वर्षात शासनाच्या आदेशाप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करून धान खरेदी केली. धान पावसाळ्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने उचल करणे गरजेचे होते. परंतु धानाची उचल न केल्याने खरेदी संस्थेने या धानावर ताडपत्री बांधून ठेवली. पावसाळ्यातील पाण्यात हे सर्व धान ओले झाले. त्यामुळे हे धान सडू लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी :  खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत खरेदी केलेेले अंदाजे एक हजार क्विंटल धान उघड्यावर ठेवले होते. हे उघड्यावर ठेवलेले धान देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाने उचल न केल्याने पावसात पाण्यात भिजून सडले आहे. या सडलेल्या धानाची दुर्गंधी येत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे सडलेल्या धानाची त्वरित उचल करण्याची मागणी सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम व गावकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगाम २०२०-२१ या वर्षात शासनाच्या आदेशाप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करून धान खरेदी केली. धान पावसाळ्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने उचल करणे गरजेचे होते. परंतु धानाची उचल न केल्याने खरेदी संस्थेने या धानावर ताडपत्री बांधून ठेवली. पावसाळ्यातील पाण्यात हे सर्व धान ओले झाले. त्यामुळे हे धान सडू लागले. आता या सडलेल्या धान्यापासून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. डवकी केंद्रात ठेवलेले धान सडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे बाजूला असलेले विद्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे शासन कोरोना संसर्गामुळे गाव व शहर परिसर स्वच्छ ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान करते तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळाच्या दिरंगाईमुळे या केंद्रातील धानाची उचल न केल्याने सर्व धान सडले. तरी हे सडलेले सर्व धान डवकी केंद्रातून इतरत्र हटविण्याची मागणी येथील आदिवासी सहसंस्थेच्या संचालक मंडळात दिले. शिष्टमडळात डवकी येथील सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम, सरपंच उमराव बावणकर, उपसरपंच गोपाल परसगाये, गजानन बावनकर, शकील शेख, दिनेश फरदे, विलास फरदे, रामचंद्र परसगाये यांचा समावेश होता. 

टॅग्स :Healthआरोग्य