शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

महिलांची भूमिका अर्थमंत्र्यांची

By admin | Updated: July 10, 2016 01:15 IST

कुटुंब व्यवस्थेत स्त्रीला महत्वाचे स्थान आहे. कुटुंबाच्या विविध गरजांचे नियोजन महिला करतात. त्यामुळे महिलांची

चंद्रकांत पुलकुंडवार : महामंडळाने केले ५८ हजार महिलांना सक्षमगोंदिया : कुटुंब व्यवस्थेत स्त्रीला महत्वाचे स्थान आहे. कुटुंबाच्या विविध गरजांचे नियोजन महिला करतात. त्यामुळे महिलांची कुटुंबातील भूमिका ही गृहमंत्र्यांची नव्हे तर अर्थमंत्र्यांची आहे, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी तथा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.शुक्रवारी (दि.८) तिरोडा येथील झरारीया सभागृहात तेजस्वीनी राज्य ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी लोकसंचालित साधन केंद्र तिरोडाच्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटनाप्रसंगी डॉ.पुलकुंडवार बोलत होते. कार्यक्र माला प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा पं.स. सभापती आशा किंदरले, युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे, युनिसेफच्या राज्य सल्लागार भारती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी केशव पवार, तेजस्वीनीच्या अध्यक्ष लिला बिसेन, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सहायक समन्वय अधिकारी सतीश मार्कंड उपस्थित होते.पुलकुंडवार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास केला जात आहे. बचतगटातील महिलांनी विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन शेतीपूरक व्यवसाय सुरु करावे. नवनविन मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होत आहेत, त्याचा पुरेपूर वापर करुन आपल्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळवून द्यावी. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी दुबार व तिबार पिके घेण्यासाठी बचतगटातील महिलांनी त्यांना प्रवृत्त करावे. केवळ धानाचे उत्पादन न घेता, नगदी पिकाकडे शेतकरी वळला पाहिजे यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. बचतगटाच्या महिला कुटुंबाचा आधार बनल्याचे त्यांनी सांगितले.तिरोडा येथील मार्केटिंक केंद्र बचतगटाच्या उत्पादीत मालांची विक्र ी करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बचतगटातील महिलांनी घेतलेल्या कर्जातून जास्तीत जास्त पैसा कोणत्या व्यवसायातून उपलब्ध होईल अशा व्यवसायाची निवड करावी. सुरु केलेले व्यवसाय जास्तीत जास्त नफ्यात कसे येतील याकडे लक्ष द्यावे. सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात महिलांनी महत्वाची भूमिका बजावावी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी किंदरले म्हणाल्या, बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा विकास होत आहे. बचतगटातून महिलांनी आपले कतृत्व सिध्द केले आहे. आजची महिला शिक्षित असून सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्याप्रकारे प्रवेश केला आहे. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श पुढे ठेवून महिला वाटचाल करीत आहेत. महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देवून विकासाला गती द्यावी व आत्मविश्वासाने वाटचाल करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.देशपांडे म्हणाले, महिलांनी आयुष्याचा मोठा काळ बचतगटात घालविला आहे. भावी आयुष्याची तरतूद बचतगटातील सदस्यांनी नियोजनपूर्वक करावी. बचतगटामुळे महिलांची शक्ती वाढली आहे. दिर्घकालीन उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून बचतगटांनी काम करावे. बचतगटातील सदस्यांचा एकमेकांवर विश्वास असला तर बचतगटाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होतो, असेही ते म्हणाले.देशमुख म्हणाले, कुटुंब व समाजाच्या प्रगतीसाठी बचतगट उपयुक्त आहे. महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी बचतगटाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येक महिला ही कुटुंबाची आधारस्तंभ आहे. महिलांनी वैयक्तीक प्रगतीसोबत समाजाच्या प्रगतीसाठी काम करावे. गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून गावातील कोणतेही कुटुंब शौचालयाविना राहणार नाही यादृष्टीने काम करावे. जे शौचालय बांधत नाही त्यांचे शौचालय बांधकाम करण्याबाबत मनपरिवर्तन करण्याची भूमिका बचतगटातील महिलांनी पार पाडावी. यावेळी युनिसेफच्या सल्लागार भारती, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकेतून सोसे म्हणाले की, जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने ७ तालुक्यात विविध महिला बचतगटांची निर्मीती करु न ५८ हजार महिलांना सक्षम केले आहे. मागीलवर्षी या बचतगटांना उद्योग व्यवसायासाठी १९ कोटी रु पये उपलब्ध करु न दिले. यावर्षी २७ कोटी रु पये कर्ज स्वरु पात बचतगटांना देण्याचे उिद्दष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम्रपाली महिला बचतगट मुंडीकोटाच्या डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील रमाबाई आंबेडकर महिला बचतगट बेलाटी, माऊली महिला बचतगट करटी, तुलसी महिला बचतगट परसवाडा, आधार महिला बचतगट गांगला, ओक महिला बचतगट सातोना व दुर्गा महिला बचतगट मेंदीपूर या बचतगटांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तेजस्वीनी लोकसंचालित साधन केंद्र तिरोडाच्या अहवाल पुस्तिकाचे सन २०१५-१६ चे विमोचन करण्यात आले. या सभेत सन २०१५-१६ चा वार्षिक अंदाजपत्रकाचे आढावा वाचन करण्यात आला. सन २०१६-१७ च्या वार्षिक अंदाजपत्रक व नियोजन वाचन करुन मंजूरी प्रदान करण्यात आली. वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक पूर्ततेकरीता विशेष नियोजनावर, कृषी सेवा केंद्राविषयी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानावर चर्चा करण्यात आली. सभेला सहयोगीनी, प्रभाग समन्वयक, तालुका अभियान कक्षातील कर्मचारी, वस्ती समुदाय साधन व्यक्ती, ग्रामसंस्था लेखापाल, पशु सखी, कृषी सखी, मत्स्य सखी, बँक मित्रा, कायदा साथी, तालुका उपजिविका व्यवस्थापक, तालुका उपजिविका सल्लागार उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी अनिता आदमने, शिल्पा येडे, प्रितम पारधी, विनोद राऊत, सारिका बंसोड, सुनिल पटले, चित्रा कावळे, रेखा रामटेके, निशा मेश्राम, लक्ष्मीप्रसाद बारापात्रे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सविता तिडके यांनी तर आभार नंदेश्वरी बिसेन यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)