शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:09 AM

कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्ह्यातील शेततळ्यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हयातील शेती पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या शेतात येत्या काळात रोहित्रासकट वीज जोडणी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जा, नवीन आणि नविकरणीय उर्जामंत्री उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.तिरोडा तालुक्यातील ग्राम पांजरा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम महागाव, गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी, गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी या महावितरणच्या ५ उपकेंद्राच्या ई-लोकार्पण. तसेच मुंडीपार, ठाणेगाव, कोकणा, ठाणा, मुल्ला, तिरखेडी, रामनगर, रापेवाडा, गुमधावडा या ९ वीज उपकेंद्राच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. येथील गोरेगाव रोड मार्गावर आयोजीत कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. मंचावर आमदार गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भैरसिंग नागपूरे , केशवराव मानकर, रमेश कुथे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद उपस्थित होते.नामदार बडोले यांनी, एक शेतकरी एक रोहित्र ही योजना अतिशय उपयुक्त असून यामुळे शेतीला मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये पथदिवे व वीज सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने ८१० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. प्रास्तावीक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी मांडले. संचालन श्रीमती मनिषा दुबे व कुमार कोकणे यांनी केले.विद्युत सेवकांची हजेरी लवकरचगोंदिया शहर परिसरातील विजेची समस्या दुर करण्यासाठी २८ कोटी रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात आणखी १८ कोटी रूपयांची कामे करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून याला लवकरच प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे नामदार बावनकुळे यांनी सांगीतले. ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद झाल्यावर तो सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागतो. यावर उपाय म्हणुन जिल्हयातील ४८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हयातील २२२ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करून उमेदवारांची नावे महावितरणकडे पाठवली आहेत. लवकरच हे ग्रामविद्युत सेवक हजर होतील अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे