शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सीएए विरोधात तिरोड्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

सीएए, एनआरसी विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यातंर्गत बहुजन क्रांतीच्या नेतृत्त्वात शहरात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जुनी नगर परिषदेजवळ पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर मान्यवरांची मोर्चाला संबोधित केले.

ठळक मुद्देगोंदियात बंदला संमिश्र प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनआरसी व एनपीए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२९) उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.सीएए, एनआरसी विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यातंर्गत बहुजन क्रांतीच्या नेतृत्त्वात शहरात मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा जुनी नगर परिषदेजवळ पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर मान्यवरांची मोर्चाला संबोधित केले.संविधानाचे प्रास्ताविक व राष्ट्रगीताने मोर्चाचे समारोप करण्यात आला. माजी आमदार दिलीप बन्सोड, अ‍ॅड.नरेश शेंडे, मोहम्मद भाई, शिममभाई, सलिमभाई व नागरिक उपस्थित होते.गोंदियात बंदला संमिश्र प्रतिसादगोंदिया: बहुजन क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२९) राष्ट्रव्यापी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. गोंदियात समिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या मुख्य बाजार परिसरात बंदचा प्रभाव नव्हता. शहराच्या इतर भागातील दुकाने मात्र दुपारपर्यंतच बंद होती. बहुजन क्रांती मोर्चाने सीएए,एनपीए व एनआरसीच्या विरोधात २९ जानेवारीला भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. गोंदियात अनेक संघटनांनी एकत्र येऊन बंदचे आवाहन केले होते. आंदोलनकर्त्यांनी सकाळी शहराचे भ्रमण करून व्यावसायीकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. रामनगर, रेलटोली, मरारटोली, कुडवा नाका, वाजपेई चौक परिसरात काही दुकाने बंद होती. शहराच्या मुख्य बाजार परिसरात बंदचा प्रभाव नव्हता. नेहरू चौक, जयस्तंभ चौक परिसरात काही दुकाने बंद होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळपासून आंदोलनकर्ते उपस्थित झाले होते. या वेळी अनेक वक्तांनी सीएए, एनपीए व एनआरसी यावर मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश खोब्रागडे, विरेंद्र जायस्वाल, छप्पर बंद आंदोलनाचे छन्नूभाई, बसपा कार्यकर्ता सुनील भरणे, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक जुबेर खान यांनी या आंदोलनाचे प्रास्तविक मांडले. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीMorchaमोर्चा