शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान स्पर्धेची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

या उपक्रमात शिक्षक व पालकांचे सहकार्य मिळत असल्याने ऑनलाईन स्टडी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घरी राहून ज्ञानार्जनाचे करीत आहेत. दररोज विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जात आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षेसाठी कहुत अ‍ॅप तयार करून अ‍ॅपद्वारे लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ठळक मुद्देनाविण्यपूर्ण उपक्रम, इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

यशवंत मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाच्यावतीने संचारबंदी लागू करून ३ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची खबरदारी म्हणून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवून नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या संकल्पनेतून १३ एप्रिलपासून शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनात आॅनलाईन उपक्रम राबविला जात आहे.यामुळे जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.या उपक्रमात शिक्षक व पालकांचे सहकार्य मिळत असल्याने ऑनलाईन स्टडी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घरी राहून ज्ञानार्जनाचे करीत आहेत. दररोज विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जात आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षेसाठी कहुत अ‍ॅप तयार करून अ‍ॅपद्वारे लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय म्हणून देशात संपूर्ण लॉकडाऊन आहे. विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात आली. परंतु शैक्षणिक सत्रात अभ्यासक्र म पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने वर्क फॉर्म होम ऑनलाईन स्टडी हा उपक्र म केला आहे. मोबाईलमध्ये व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार केले जात आहे. या माध्यमातून संबधित शिक्षक त्यांना आॅनलाईन स्टडी उपक्र मातंर्गत शिक्षण देत आहे. इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग असून जिल्ह्यात एकूण ६० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढावे व त्यांना विविध क्षेत्रातील नवनवीन प्रश्न व उत्तरांची माहिती व्हावी यासाठी आॅनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा उपक्रमास सुरूवात करण्यात आली आहे. विद्यार्थी आपल्या घरूनच यात सहभाग नोंदवून परीक्षा देत आहेत. दररोज ही परीक्षा घेण्यात येत असून स्पर्धेची प्रश्नावली तयार करणे व संनियंत्रण गौतम बांते करीत आहेत. आमगाव तालुक्यातील इयत्ता ६ ते ८ च्या ५ हजार २६८ विद्यार्थ्यांना आॅनलाईन सामान्य ज्ञान प्रश्नावली हाताळण्यासाठी गटशिक्षणाधिकारी वाय. सी. भोयर यांच्या नियंत्रणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी