शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

लिलावातून मिळणार ४४ लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:08 IST

जिल्ह्यातील आठवडी बाजारावर शुल्क आकारुन विकासावर खर्च करण्यासाठी आठवडी बाजारांचे कंत्राट ई-निविदेद्वारे देण्यात येणार आहे. सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ पैकी २३ बाजारांचा लिलाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२३ बाजारांचा करणार लिलाव : जि.प.च्या उत्पन्नात १३.४६ लाखांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील आठवडी बाजारावर शुल्क आकारुन विकासावर खर्च करण्यासाठी आठवडी बाजारांचे कंत्राट ई-निविदेद्वारे देण्यात येणार आहे. सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ पैकी २३ बाजारांचा लिलाव करण्यात आला आहे. या २३ बाजारांच्या लिलावातून ४३ लाख ७८ हजार ४७८ रुपयांचा महसूल जिल्हा परिषदेला मिळणार आहे. या लिलावातून शासकिय दरापेक्षा १३ लाख ४६ हजार ३८७ रुपये अधिक मिळणार आहे.गोंदिया जिल्हा परिषदेने आठवडी, बैठकी बाजार, पशु बाजार व यात्रा स्थळावर बाजार शुल्क वसूल करण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. यात २३ बाजारांचा लिलाव करण्यात आला आहे. यांतर्गत गोंदिया तालुक्यातील अदासी बाजाराचा लिलाव २७ हजार ५०१ रुपयांत करण्यात आला. यात शासकीय बोलीपेक्षा ५ हजार ७५७ रूपये जास्त मिळणार आहे. दासगाव बु. बाजाराचा लिलाव १ लाख ५५ हजार २५१ रुपयांत करण्यात आला. यात शासकीय बोलीपेक्षा ३९ हजार ९३५ रूपये जास्त मिळणार आहे. कामठा बाजाराचा लिलाव १ लाख २० हजार रुपयांत करण्यात आला. यात शासकीय बोलीपेक्षा ४५ हजार ९० रुपये जास्त मिळणार आहे. मुरदाडा बाजाराचा लिलाव १ लाख ११ हजार १११ रुपयात करण्यात आला असून यात ३७ हजार ७७७ रूपये जास्त मिळणार आहे. पांढराबोडी बाजाराचा लिलाव १ लाख २० हजार ३४ रुपयांत करण्यात आला असून यात ६ हजार रूपये जास्त मिळणार आहे.रावणवाडी बाजाराचा लिलाव ३ लाख ३० हजार १३१ रुपयांत करण्यात आला असून यात शासकीय बोलीपेक्षा १ लाख २४ हजार ६५ रूपये जास्त मिळणार आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोरा खु. बाजाराचा लिलाव २५ हजार ७९० रुपयात करण्यात आला असून यात ८ हजार ६ रूपये जास्त मिळणार आहे. मुंडीकोटा बाजाराचा लिलाव ३ लाख ७६ हजार ८९० रुपयांत करण्यात आला असून यात ११ हजार ३२४ रूपये जास्त मिळणार आहे. सुकडी-डाक. बाजाराचा लिलाव ८६ हजार १०० रुपयांत करण्यात आला असून यात १४ हजार ८६६ रूपये जास्त मिळणार आहे. वडेगाव बाजाराचा लिलाव ३ लाख ८ हजार ६३४ रुपयांत करण्यात आला असून यात १ हजार रुपये जास्त मिळणार आहे. सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द बाजाराचा लिलाव ५ लाख १ हजार ५०० रुपयांत करण्यात आला असून २ लाख ४४ हजार ६० रुपये जास्त मिळणार आहे.कोटजंभूरा बाजाराचा लिलाव २० हजार ५ रुपयांत करण्यात आला असून यात ६ हजार ४३९ रुपये जास्त मिळणार आहे. साखरीटोला बाजाराचा लिलाव ३ लाख १ हजार १०० रुपयांत करण्यात आला असून यात १ लाख १९ हजार ६३६ रुपये जास्त मिळणार आहे. देवरी तालुक्यातील चिचगड बाजाराचा लिलाव ३ लाख ५० हजार रुपयांत करण्यात आला असून यात १ लाख ६६ हजार ३०० रुपये जास्त मिळणार आहे. ककोडी बाजाराचा लिलाव २ लाख ५५ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ८५ हजार ४९० रुपये जास्त मिळणार आहे. सावली डोंगरगाव बाजाराचा लिलाव १ लाख ३ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ३१ हजार ५०० रुपये जास्त मिळणार आहे. गोरेगाव तालुक्यातील चोपा बाजाराचा लिलाव ८० हजार १३१ रुपयांत करण्यात आला असून यात २९ हजार ६७७ रुपये जास्त मिळणार आहे. कुºहाडी बाजाराचा लिलाव १ लाख ४६ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ५४ हजार ७९६ रुपये जास्त मिळणार आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी बैठकी बाजाराचा लिलाव १ लाख २५ हजार रुपयांत करण्यात आला असून यात २७ हजार ७९६ रूपये जास्त मिळणार आहे.पांढरी येथील पशु बाजाराचा लिलाव ६ हजार ८०० रुपयांत करण्यात आला असून यात ५४ रुपये जास्त मिळणार आहे. सौंदड बाजाराचा लिलाव २ लाख ३१ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ८६ हजार ५३४ रुपये जास्त मिळणार आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड बाजाराचा लिलाव १ लाख १ हजार रुपयांत करण्यात आला असून यात शासकीय बोलीपेक्षा ५ हजार ३०० रूपये जास्त मिळणार आहे.तीन बाजारांचा लिलाव स्थगीतसालेकसा तालुक्यातील जमाकुडो या बाजाराची शासकीय बोली ५ हजार ६४६ आहे. परंतु हे बाजार स्थगीत आहे. सुकडी-डाकराम यात्रा स्थळ या बाजाराची शासकीय बोली ३ हजार ४१० रुपये तर गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा येथील यात्रा स्थळाची बोली २ हजार १०९ रुपये आहे. परंतु या बाजारांवरही स्थगिती आहे.