शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभाग शंभूटोला घाटावरील माफियांवर मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:34 IST

वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली. आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदारांनी वरिष्ठांना दाखविण्यासाठी थातूर-मातूर कारवाई केली.

ठळक मुद्देवरिष्ठांना दाखविण्यासाठी थातूर-मातर कारवाई : बाह्मणी घाटावरील दोन ट्रॅक्टर पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली. आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदारांनी वरिष्ठांना दाखविण्यासाठी थातूर-मातूर कारवाई केली. परंतु ही कारवाई शंभूटोला घाटावर करण्यात आली नसून बाम्हणी घाटावर करण्यात आली.न्यायालयाने घाट लिलाव करण्याची परवानगी न दिल्यामुळे जिल्ह्यातील एकही घाट लिलाव झाले नाही. मात्र रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. आमगाव तालुका वगळता सातही तालुक्यात रेती चोरी संदर्भात कारवाई होत असल्याची जोरदार चर्चा आहे. परंतु मागील दोन वर्ष रेती चोरांवर अंकुश लावणारा आमगावचा महसूल विभाग यंदा रेती माफीयांवर मेहरबानच आहे. शंभूटोला येथील तरूणांनी रेती माफीयांच्या विरोधात एल्गार पुकारून यासंदर्भात तहसीलदाराकडे तक्रार केली.परंतु तहसीलदारांनी कारवाई न केल्यामुळे तरूण माध्यमांकडे गेले.माध्यामांनी बातम्या प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला कारवाई दाखविण्यासाठी ३१ जानेवारीला आमगाव तालुक्याच्या बाम्हणी घाटावर रेती वाहून नेतांना दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले.ज्यांचे महसूल विभागाशी देणे-घेणे नाही. अश्या रेती वाहून नेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु ज्या रेती माफीयांसोबत महसूल विभागाचा ताळमेळ आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. शंभूटोला घाटाची विदारक स्थिती माध्यमांनी दाखवूनही त्या घाटातून रेती चोरी सुरूच आहे. फक्त त्या रेती माफीयांनी रेती वाहून नेण्याचा मार्ग बदलविला आहे.उपसा झालेल्या रेतीची मोजणी कराशंभूटोला घाटातून ५०० ते १००० ब्रास रेतीचा अवैध उपसा करण्यात आल्याचा आरोप शंभूटोला येथील तरूण करीत आहेत. परंतु या घाटावर रेती माफीयांवर कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी दाखविले नाही. शंभूटोला येथून चोरी करण्यात आलेल्या रेतीचा झालेल्या उपसाचे मोजमाप करून तेवढा महसूल संबधीत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :sandवाळू