शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसानचे पैसै परत करा, नाही तर चढणार सातबारावर बोजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 05:00 IST

मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणारे शेतकरी पैसे परत करत नसल्याने आता या शेतकऱ्यांच्या सातबारावर बाेजा चढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी व अधिकारीसुद्धा घेत असल्याची बाब सर्वेक्षणात पुढे आली. गोंदिया जिल्ह्यात २९६९ आयकर भरणारे शेतकरी असून त्यांना जिल्हा प्रशासनाने नाेटीस बजावून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्यास सांगितले. मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणारे शेतकरी पैसे परत करत नसल्याने आता या शेतकऱ्यांच्या सातबारावर बाेजा चढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पीएम किसानचे पैसे परत केले नाही तर सातबारावर बोजा चढून पुढे समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच रक्कम परत करावी लागणार आहे. 

पैस परत न केल्यास चढणार सातबारावर बोजा आयकर भरणारे शेतकरीसुद्धा पीएम किसान सन्मान योजनेच्या पेन्शनचा लाभ घेतली असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना नोटीस बजावून पेन्शन स्वरुपात घेतलेले पैसे परत करण्यासाठी नोटीस बजावली. मागील चार वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे पण त्यानंतरही दीड हजारांवर शेतकऱ्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर आता बाेजा चढविला जाणार आहे. 

१ कोटी २५ लाख रुपये झाले वसूल - जिल्ह्यात आयकर भरणारे २९६९ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतंर्गत २ कोटी ७५ लाख रुपयांचे पेन्शन स्वरूपात रक्कम घेतली होती. महसूल विभागाने या शेतकऱ्यांना नोटीस बजाविल्यानंतर १०९४ शेतकऱ्यांनी १ कोटी २५ लाख रुपये शासनाकडे जमा केले. 

१ कोटी २७ लाख रुपये लटकले- जिल्ह्यात आयकर भरणारे २९६९ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतंर्गत २ कोटी ७५ लाख रुपयांचे पेन्शन स्वरूपात रक्कम घेतली होती. यापैकी १०९४ शेतकऱ्यांनी रक्कम परत केली तर १९५४ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली नाही. 

शेतकऱ्यांनो ३१ जुलैपर्यंत करा केवायसी पीएम किसान पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील ८२ हजार शेतकरी केवायसी करण्यापासून वंचित असल्याने शासनाने केवायसी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना