शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला.

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण : शासनाला पाठविणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा खरीप हंगामातील १४०० हेक्टरमधील धानाला फटका बसला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे ३३ टक्केहून अधिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तयार केला असून तो लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला. यंदा जवळपास ४० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी हलक्या धानाची लागवड केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी या धानाची कापणी देखील केली होती. तर काही शेतकऱ्यांनी मळणी सुरु केली होती. मात्र याच दरम्यान सलग आठवडाभर पाऊस झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर संपूर्ण हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले आहे. यात १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.याबाबतचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. हा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.केवळ २०६ शेतकऱ्यांच्या तक्रारीपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागते. मागील महिन्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र विमा कंपनीकडे केवळ २०६ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण कृषी विभागातंर्गत करण्यात आले. १४०० हेक्टरमधील पिकांना याचा फटका बसला असून यासंबंधिचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येईल.- गणेश घोरपडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती