शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून होणार निर्बंध शिथिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

गोंदिया : राज्यात सर्वत्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. गोंदिया जिल्हासुद्धा कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळेच शासनाने सोमवारपासून कोरोनाचे ...

गोंदिया : राज्यात सर्वत्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. गोंदिया जिल्हासुद्धा कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळेच शासनाने सोमवारपासून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून करण्यात येणार असून, त्या दृष्टीने जिल्हास्तरावर हालचाली सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच डेल्टा व डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यापासून काही प्रमाणात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लागू केले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्वच वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र आता सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे तर जिल्ह्यात केवळ दहा कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, चार तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे तर उर्वरित चार तालुक्यात एक दोनच रुग्ण आहेत. एकंदरीत जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल आहे. ही सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांनीसुद्धा कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, तर राज्यस्तरावरसुद्धा व्यापारी संघटनांनी शासनाकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यामुळेच राज्य सरकारसुद्धा यावर अनुकूल असल्याची माहिती आहे. काही मंत्र्यांनीसुद्धा गुरुवारी (दि. २९) सोमवारपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भातील आदेश अद्याप प्राप्त झाले नाही. मात्र शुक्रवारी आदेश प्राप्त होताच त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले.

...............

व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले, तर अजूनही काही प्रमाणात निर्बंध लागू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता संसर्ग आटोक्यात आला असून, निर्बंध शिथिल करून सर्वच दुकाने सकाळी ८ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी गोंदिया येथील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तर आता शासनसुद्धा यावर अनुकूल असून, सोमवारपासून निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे वार्तने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

...........

गर्दी कमी करण्यास होणार मदत

सध्या सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवली जातात. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र होते. मात्र सोमवारपासून निर्बंध शिथिल झाल्यास बाजारपेठेत होणारी गर्दी वेळेत वाढ झाल्यामुळे कमी करण्यास मदत होणार आहे.

..........

शनिवार, रविवार पूर्णपणे बंद

सोमवारपासून कोरोनाचे निर्बंध शिथिल होण्याचे संकेत शासनाने दिले आहे. मात्र शनिवार आणि रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती आहे. मात्र यासंदर्भातील परिपत्रक आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे.