शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:35 IST

शहरातील महत्त्वपूर्ण अशा अग्निशमन विभागाचा कारभार मागील पाच वर्षांपासून प्रभारावर चालत आहे. सन २०१२ पासूनचा हा प्रकार असून सध्या विभागातील लिडींग फायरमनकडे विभागाचा प्रभार देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासूनचा प्रकार : लिडींग फायरमनकडे दिला प्रभार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील महत्त्वपूर्ण अशा अग्निशमन विभागाचा कारभार मागील पाच वर्षांपासून प्रभारावर चालत आहे. सन २०१२ पासूनचा हा प्रकार असून सध्या विभागातील लिडींग फायरमनकडे विभागाचा प्रभार देण्यात आला आहे. यातून नगर परिषदेतील कारभाराची प्रचिती येते. नगर परिषदेकडून या विषयावर पाठपुरावा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र मागील पाच वर्षात या विषयात नगर परिषदेच्या हाती काहीच लागले नाही हे विशेष.शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभाग म्हणजे एक महत्वपूर्ण व जबाबदार विभाग आहे. आगीची एखादी घटना घडल्यास हा विभाग किती महत्वाचा आहे याची प्रचिती येते. मात्र गोंदिया शहराची कमनशिबीच म्हणावी लागेल की एवढ्या महत्वाच्या या विभागाला प्रभाराचे ग्रहण लागले आहे. मागील पाच वर्षांपासून या विभागाला मुख्य अग्निशमन अधिकारी लाभलेले नाही. परिणामी विभागातील कर्मचाºयांना त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार प्रभार देण्याचे काम सुरू आहे.सन २०१२ मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी जी.एच.ब्राम्हणकर सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच अग्निशमन विभागाला प्रभाराचे ग्रहण लागले आहे. ब्राम्हणकर गेल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकाºयांचा प्रभार प्रकाश कापसे यांच्याकडे देण्यात आला होता. आता मात्र कापसे ३१ आॅक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने पुन्हा रिक्त झालेली ही खुर्ची आता लिडींग फायरमन सी.एल.पटले यांच्याकडे देण्यात आली आहे. मागील पाच वर्षांपासून अग्निशमन विभागात हा प्रकार सुरू आहे.नगर परिषद प्रशासनाकडून या विषयाला घेऊन पाठपुरावा केला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र यात वास्तवीकता किती हेच कळत नाही. कारण, सन २०१२ पासून प्रयत्न सुरू असूनही एवढ्या महत्त्वपूर्ण विषयाकडे शासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने एकतर नगर परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी कमी पडत असतील. नाही तर शासनाला गोंदिया शहर व शहरातील जनतेशी काहीच घेणे नाही असे समजावे अशा प्रतिक्रिया आता शहरवासी देत आहेत. त्यामुळे आता आणखी किती काळ येथील अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारावर चालतो हे बघायचे आहे.हॉटेल बिंदलच्या घटनेने कारभार उजेडातशहरातील हॉटेल बिंदलमध्ये आग लागल्याची घटना अत्यंत दुर्देवी घडली. याप्रसंगी अदानीच्या अग्निशामकांचा मोठा आधार झाला होता. येथील अग्निशमन विभागानेही पाहिजे तसे प्रयत्न केले होते. मात्र या घटनेने येथील अग्निशमन विभाग किती तत्पर आहे हे उजेडात आणले होते. विभागाकडे जबाबदार प्रमुखच नसल्याने त्या विभागाचा कारभार कसा चालणार हे सांगायची गोष्ट नाही.मुख्य अग्निशमन अधिकाºयांचे पद भरावे यासाठी सप्टेंबर महिन्यापासून दोन वेळा प्रधान सचिवांसोबत बैठका झाल्या आहेत. यात अतिरिक्त पदे भरण्याचीही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र अग्निशमन संचालनालयाच्या संचालकांनीही ८० पदे मंजूर करण्याबाबतचे शिफारस पत्र शासनाकडे पाठविले आहे. आमच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे.- चंदन पाटीलमुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.