लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (दि.१४) सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता घरच्या घरी साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जयंती उत्सव समित्यांनी केले होते. या आवाहनाला समाजबांधवांनी सुध्दा प्रतिसाद देत घरच्या घरीच जयंती साजरी करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहली.दरवर्षी १४ एप्रिलला जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या स्वरुपात साजरी केली जाते. या निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र यंदा देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. तर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन आणि जयंती उत्सव समित्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन साजरी करण्याचे आवाहन केले होते. याला जिल्ह्यातील समाजबांधवानी प्रतिसाद दिला.लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनी घरच्या घरीच जयंती कार्यक्रम साजरा करुन बाबासाहेबांना अभिवादन केले. समाजबांधवांनी अगदी शांतेत आणि नियमांचे पालन करुन जयंती कार्यक्रम साध्या स्वरुपात साजरा करुन इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.जयंती कार्यक्रमाचा निधी गरजूंसाठीडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी गोळा झालेला निधी इतर कुठल्या गोष्टीसाठी खर्च न करताना जयंती उत्सव समित्यांनी या निधीचा वापर गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी केला. समित्यांनी जयंती दिनी गरजू कुटुंबांपर्यंत पोहचून त्यांना अन्नधान्याची आणि किराणा सामानाची मदत करुन मदतीचा हात दिला.ऑनलाईन उपक्रमडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून संविधान मैत्री संघ व जयंती उत्सव समित्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर चित्रकला स्पर्धा व चर्चासत्र सुध्दा घेतले. याला देखील समाजबांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रशासनाच्या आवाहनाला समाजबांधवांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST
दरवर्षी १४ एप्रिलला जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या स्वरुपात साजरी केली जाते. या निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र यंदा देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. तर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाच्या आवाहनाला समाजबांधवांचा प्रतिसाद
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : घरीच साजरी केली जयंती