शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

शासनाच्या मदतीविनाच सामाजिक कार्य करण्याचा संकल्प

By admin | Updated: January 8, 2016 02:28 IST

आधुनिक व्यस्त काळात व्यक्ती केवळ आपली व परिवाराची चिंता करतो. दुसऱ्यांच्या गैरसोयी व समस्या सोडविणे तर दूरच. समाजकार्याचा विचार व तशी कृती करणारे तर नगण्यच आहेत.

हेल्पिंग हँन्ड गृप : दर रविवारी ग्रामसफाई, वृक्षारोपण व रूग्णांना मदतगोंदिया : आधुनिक व्यस्त काळात व्यक्ती केवळ आपली व परिवाराची चिंता करतो. दुसऱ्यांच्या गैरसोयी व समस्या सोडविणे तर दूरच. समाजकार्याचा विचार व तशी कृती करणारे तर नगण्यच आहेत. समर्पित भावनेने समाजकार्य करणाऱ्या मोजक्याच संस्था असतात. देशात अनेक अशासकीय संघटन, बहुउद्देशिय संस्था आदी विविध प्रकारे जनजागृती व लोककल्याणकारी कार्यक्रम क्रियान्वित करतात. परंतु ते सर्व शासकीय अनुदानावर निर्भर असतात. अशात जे लोक नि:स्वार्थ भावाने, कोणत्याही अनुदानाविना विविध प्रकारचे सामाजिक कार्य करतात, खरोखरच ते प्रसंशनिय आहेत.उल्लेखनिय म्हणजे तिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथे ‘हेल्पिंग हँड गृप’च्या वतीने करण्यात येणारे समाजकार्य प्रेरणादायक आहे. याचे सर्व सदस्य दर रविवारी एकत्रित येवून ग्रामसफाई, वृक्षारोपण, त्यांचे संवर्धन, दुर्बल घटकातील वृद्ध व रूग्ण नागरिकांना वेळेप्रसंगी मदत यासारखे सामाजिक कार्य शासकीय अनुदानाशिवायच करीत आहेत. हेल्पिंग हँडचे सदस्य प्पू सैयद यांनी सांगितले, गृपमध्ये एकूण २५ सदस्य आहेत. सदस्य संख्या वाढतच आहे. सदस्यत्वासाठी वयाची अट नाही. सध्या आठ ते ५५ वर्षे वयापर्यंतचे सदस्य यात सहभागी आहेत. मंगेश पटले नामक युवकाच्या संकल्पनेतून गठित या गृपचे सदस्य कोणत्या गरीब, विधवांच्या मदतीसाठी आपसातच पैसे गोळा करून सेवा करतात. त्यांच्याद्वारे नुकतेच जवळील फकीरटोली येथील रहिवासी तुफानवी फकीर व कशीदा फकीर नावाच्या गरीब विधवांच्या गवताच्या झोपडीवर झाकण्यासाठी ताडपत्रीची सोय करून देण्यात आली. त्यांनी सांगितले की, त्यांचा गृप भविष्यातही अशाप्रकारच्या सामाजिक जबाबदारी सांभाळत राहील. त्यासाठी शासकीय अनुदानाची आवश्यकता राहणार नाही. काचेवानी येथील ‘हेल्पिंग हँड गृप’च्या सदस्यांमध्ये मंगेश पटले, गोविंद कटरे, अजित जांभूळकर, निलेश कराडे, पप्पू सैयद, सुनील बन्सोड, संजय गुणेरिया, आदेश जांभूळकर, सागर पारधी, अमन असाटी, तुषार टोपरे, अली टायरवाला, प्रवीण पटले, कमलेश जांभूळकर, बंडू पारधी, महेश रहांगडाले, राकेश पटले, राजेश कोडवती, बालू खुडसिंगे, दादू पटले, प्रदीप फुटरे, संतोष उईके, संतोष चौधरी, मनिष पारधी व प्रशांत चौधरी यांचा समावेश आहे. या गृपची विशेषता म्हणजे यात कोणीही अध्यक्ष किंवा सचिव नाही. सर्व समानपणे सदस्यच आहेत. (प्रतिनिधी)