वेध जिल्हा परिषद निवडणुकीचे : सर्वजण लागले तयारीलानामदेव हटवार - सालेकसानुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण घोषित करण्यात आले. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. तरीही ‘एक अनार और सौ बिमार’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक पक्षात अनेक कार्यकर्ते आपापले दावे पक्ष श्रेष्ठींसमोर मांडत आहेत. मागच्या कार्यकाळासाठी तालुक्यातील ३ जागा महिलांना राखीव होत्या. १ जागा एसटीसाठी होती. त्यामुळे अनेक इच्छुकांना जि.प.मध्ये महिलांमुळे व राखीव जागेमुळे उभे राहता आले नाही. पाच वर्षे वाट बघायची ठरविले व आता त्यांची लॉटरी निघाली. झालीया जिल्हा परिषदेत प्रथमच राष्ट्रवादीच्या देवकीबाई नागपुरे जि.प.सदस्य बनल्यात. आता सर्व साधारणसाठी राखीव असल्यामुळे राष्ट्रवादीकडून लक्ष्मण नागपुरे, भाजपकडून माजी जि.प.सदस्य मेहतर दमाहे, माजी सभापती खेमराज लिल्हारे, अरुण टेंभरे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून जिल्हा महासचिव यादनलाल बनोठे, पंचायत समिती सदस्य कैलास अग्रवाल, माजी सरपंच घनश्याम नागपुरे इच्छुक आहेत. शिवसेना उमेदवार शोधत आहे. पिपरीया जि.प. क्षेत्रात भाजपच्या प्रेमलता दमाहे निवडून आल्यात. या क्षेत्रात भाजपचे वर्चस्व आहे. ही जागा सर्वसाधारणसाठी असल्यामुळे दावेदार भरपूर आहेत. भाजपकडून राजकुमार दमाहे, माजी जि.प. सदस्य शंकरलाल मडावी, पं.स. सदस्य मनोज विश्वकर्मा, विरेंद्र उईके इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये खलबले सुरु आहेत की कुणाला उभे करावे. शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख सोहनलाल क्षीरसागर हे निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादीकडून कैलास धामडे उमेदवार राहू शकतात.खरी लढत आमगाव खुर्द या जिल्हा परिषद क्षेत्रात होणार आहे. येथे भाजपच्या कल्याणी कटरे जि.प.सदस्य आहेत. भाजपकडून संजू कटरे, उमेदलाल जैतवार, परसराम फुंडे, मुन्ना बिसेन, रमेश रहांगडाले सोबतच पुन्हा काही इच्छुक आहेत. काँग्रेसकडून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पूरुषोत्तम कटरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल फुंडे, को-आॅप. बँकेचे संचालक नामदेव कटरे यांच्यात निर्णय होऊ शकते. राष्ट्रवादीकडून जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष बबलू कटरे, दुर्गा तिराले इच्छुक राहू शकतात. शिवसेनाकडून तालुका प्रमुख कुलतारसिंग भाटीया उभे राहण्याच्या तयारीत आहेत. कारुटोला जि.प.चे आरक्षण एस.टी.वरुन ओबीसी महिलेसाठी राखीव झाले. त्यामुळे पुन्हा पुरुष मंडळींना पुढची पाच वर्षे वाट बघायची वेळ आली. ओबीसी महिलेसाठी काँग्रेसकडून संजय दोनोडे यांच्या पत्नी उभी राहू शकते. त्यांना पंचायत समितीत एस.सी. आरक्षणात दिलीप वाघमारे साथ देऊ शकतात. भाजपकडून माजी सभापती तुकाराम बोहरे यांच्या कुटुंबातील महिला इच्छुक आहेत. पण अजूनही भाजपमध्ये अनेक दावेदार निर्माण झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची तिकीट तालुकाध्यक्ष प्रभाकर दोनोडे यांच्याद्वारे दिली जाईल. शिवसेना उमेदवार शोधत आहेत. सर्वच ठिकाणी बसपा निवडणुकीत उमेदवार उभे करायचा प्रयत्न करणार आहे.
आरक्षणाने अनेकांच्या अपेक्षा जागृत
By admin | Updated: February 5, 2015 23:11 IST