गोंदिया : जुलै व आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या गोंदिया तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. हे आरक्षण सन २०११ च्या जनगननेनुसार जाहीर करण्यात आले.काटी ग्रा.पं.मध्ये १५ सदस्य राहणार आहेत. त्यात अनुसूचित जाती महिला १, पुरुष १, अनुसूचित जमाती महिला १, पुरुष १, मागास प्रवर्गात २ महिला, २ पुरुष तर सर्वसाधारणमध्ये ४ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. चंगेरा ग्रा.पं. मध्ये ७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १ मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये १ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. कोरणी ग्रा.पं. मध्ये ७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १ मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. बिरसोला ग्रा.पं. मध्ये ११, मागास प्रवर्गात २ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ४ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. कासा ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ४ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. जिरुटोला ग्रा.पं. मध्ये ७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, पुरुष १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये १ महिला, १ पुरुषांचा समावेश आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रावणवाडी ग्रामपंचायतीत ११ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, पुरुष १, मागास प्रवर्गात २ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. गर्रा खु. ग्रा.पं. मध्ये ११ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, पुरुष १, अनुसूचित जमाती महिला १, पुरुष १, मागास प्रवर्गात २ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. बघोली ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, पुरुष १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. बनाथर ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. कोचेवाही ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. मोगर्रा ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. परसवाडा ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, पुरुष १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. कटंगटोला ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. छिपीया ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, पुरुष १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. सावरी ग्रा.पं. मध्ये ११ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात २ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. नागरा ग्रा.पं. मध्ये १७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, मागास प्रवर्गात ३ महिला, २ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ५ महिला, ६ पुरुषांचा समावेश आहे. गिरोला ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, पुरुष १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. नवेगाव ग्रा.पं. मध्ये ७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. सोनबिहरी ग्रा.पं. मध्ये ७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. घिवारी ग्रा.पं. मध्ये ११ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, मागास प्रवर्गात २ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. लोधीटोला (धा) ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, पुरुष १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे.धापेवाडा ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. बलमाटोला ग्रा.पं. मध्ये ७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, पुरुष १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये १ महिला, १ पुरुषांचा समावेश आहे. एकोडी ग्रा.पं. मध्ये १३ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात २ महिला, २ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. गंगाझरी ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला २, पुरुष २, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये १ महिला, १ पुरुषांचा समावेश आहे. डोंगरगाव ग्रा.पं. मध्ये ११ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात २ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. सेजगाव ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. भानपुर ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. खमारी ग्रा.पं. मध्ये १७ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात ३ महिला, २ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ४ महिला, ६ पुरुषांचा समावेश आहे. पोवारीटोला ग्रा.पं. मध्ये ९ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, पुरुष १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात १ महिला, १ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये २ महिला, २ पुरुषांचा समावेश आहे. फुलचूरटोला ग्रा.पं. मध्ये १३ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात २ महिला, २ पुरुष तर सर्वसाधारणमध्ये ३ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. फुलचुर ग्रा.पं. मध्ये १३ सदस्य असून अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १, मागास प्रवर्गात २ महिला, २ पुरुष तर सर्वसाधारण मध्ये ३ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर
By admin | Updated: January 31, 2015 01:48 IST