शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात जाणाऱ्या १७ जनावरांची सुटका; मंडीयाटोला चौकात कारवाई

By नरेश रहिले | Updated: August 18, 2023 18:42 IST

चंगेरा गावाकडून तेढवा मार्गे जनावरांनी भरलेला ट्रक येत असल्याची माहिती मिळाली होती, १८ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेतर्फे पेट्रोलिंग करीत असताना कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी केली.

चंगेरा गावाकडून तेढवा मार्गे जनावरांनी भरलेला ट्रक येत असल्याची माहिती मिळाली होती.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रावणवाडी परिसरातील मंडीयाटोला चौक येथे नाकाबंदी लावून रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास तेढवाकडून येणारा ट्रक पकडला. त्या ट्रकमध्ये ९ म्हशी व ८ रेडे असे एकूण १७ जनावरे किंमत ३ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जनावरे अवैधरीत्या निर्दयतेने चाऱ्या-पाण्याविना कोंबून बंदिस्त केलेल्या स्थितीत आढळून आले. ट्रक आणि जनावरे असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्या जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता कोरणी येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणातील फरार आरोपी चालक अजित हंसराज शहारे, रा. काटी, ता.जि. गोंदिया याच्या विरुद्ध पोलिस ठाणे रावणवाडी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा, सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक फौजदार मधुकर कृपाण, पोलिस हवालदार सोमेंद्रसिंह तुरकर, तुलशीदास लुटे, चालक पोलिस हवालदार लक्ष्मण बंजार, पोलिस शिपाई संतोष केदार यांनी केली आहे.