शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

गरज ७६ कोटींची मिळाले २ कोटी ६६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली होती. सुदैवाने यंदा पाऊस पाणी चांगले झाल्याने पीक देखील चांगले होते.त्यामुळे यंदा चार पैसे शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन धान कापणीला सुरूवात केली असताना परतीचा पाऊस दमदार बरसल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देधानपिकांचे नुकसान : पहिला हप्ता प्राप्त, परतीच्या पावसाचा फटका

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीपातील धानपिकांचे नुकसान झाले. यामुळे ९ हजार ५३३ हेक्टरमधील धानपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाकडे सादर केला होता. त्या आधारावर राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असून याचा पहिला २ कोटी ६६ लाख रुपयांचा हप्ता जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.मात्र दोन्ही विभागाने पाठविलेल्या नुकसानीच्या आकडेवारीनुसार एकूण ७६ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची गरज असतांना केवळ २ कोटी ६६ लाख रुपये प्राप्त झाल्याने वाटप करायचे कसे असा पेच निर्माण झाला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली होती. सुदैवाने यंदा पाऊस पाणी चांगले झाल्याने पीक देखील चांगले होते.त्यामुळे यंदा चार पैसे शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन धान कापणीला सुरूवात केली असताना परतीचा पाऊस दमदार बरसल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेल्या. हाती आलेले पीक पावसामुळे डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने उचल केलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा,लोकांची देणी कुठून फेडायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.परतीच्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे युध्द पातळीवर पूर्ण करुन एकूण ९ हजार ५३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून यामुळे २६ हजार २६४ शेतकऱ्यांना बसला. नुकसानीच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता दोन्ही विभागाने वर्तविली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली. त्यात पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत जाहीर केली.यानुसार मदतीचा पहिला हप्ता सर्व जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्याला प्राथमिक अहवालानुसार नुकसान भरपाईसाठी एकूण ७६ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची आवश्यकता आहे. मात्र पहिल्या हप्तात केवळ २ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने वाटप करायचे कसे असा पेच प्रशासनासमोर देखील निर्माण झाला आहे.वाटप प्रक्रियेसाठी लागणार आठ दिवसनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला २ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा निधी तहसील कार्यालयांना वितरित केला जाणार आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी जमा केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड,बँक खाते क्रमांक घेतले जाणार आहे.त्यामुळे यासर्व प्रक्रियेसाठी किमान आठ दिवस लागणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.उर्वरित निधीसाठी करावी लागणार प्रतीक्षापरतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने पहिला हप्ता वितरीत केला आहे. मात्र ही रक्कम फारच तोकडी आहे.त्यामुळे शासनाकडून यासाठी पुन्हा निधी वितरीत करण्यात येणार आहे.त्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.नुकसानीचा आकडा वाढणारकृषी आणि महसूल विभागाने प्राथमिक सर्वेक्षण करुन परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र काही तालुक्यात अद्यापही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. त्यामुळे नुकसानबाधीत क्षेत्रात पुन्हा वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार