शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन

By admin | Updated: July 8, 2016 01:52 IST

तालुका काँग्रेस पक्षाची सभा मंगळवार (दि.५) येथील सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.

तालुका काँग्रेसचा पुढाकार : ककोडी ते देवरीपर्यंत काढली पदयात्रादेवरी : तालुका काँग्रेस पक्षाची सभा मंगळवार (दि.५) येथील सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. सभेत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर समस्या सोडविण्यासाठी एक निवेदन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे व माजी आ. रामरतन राऊत यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले. निवेदनानुसार, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्येला धरून ककोडी ते देवरीपर्यंत पदयात्रा मोर्चा काढण्यात आला. आपल्या समस्येचे निवेदन देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यात उपस्थित पालकमंत्री राजकुमार बडोले व आ. संजय पुराम यांना शेतकऱ्यांनी समस्येबाबत माहिती दिली. तेव्हा त्यांनी या विषयावर योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची वचनपूर्तता अद्याप करण्यात आली नाही, असे सांगण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले पीक बिमा काढले. सदर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यावरसुध्दा शासनाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. तरी शासनाने शेतकऱ्यांना २० हजार हेक्टरी मदत करावी, पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमीतकमी २०० दिवस काम मिळावे, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे भाव ३ हजार रूपये मिळायलाच हवे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. सदर मागण्या १३ जुलैपर्यंत पूर्ण न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने आ. गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री नितीन राऊत, जिल्हा अध्यक्ष बाबा कटरे, माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, भरतसिंग दुधनाग, तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया आणि जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जवाबदारी शासनाची राहील, अशा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन मंगळवार (दि.५) देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे, माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग पवार, माधुरी कुंभरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, माजी जि.प. सदस्य संदीप भाटीया, रंजित कासम, जीवन सलामे, वैभव जैन, नर्मदाप्रसाद शमार, बळीराम कोटवार, धनपत भोयर, दिलीप संगीडवार, सुरेंद्र बंसोड, चैनसिंग मडावी, अविनाश टेंभरे, तुकाराम वाघमारे, सोहन चौरे, विठ्ठल जनबंधू, कमलेश पालीवाल, बबलू कुरैशी, राजेश शहाणे, कुलदीप गुफा, अरविंद उके, नितीन धुर्वे, अनिल कासम, घनश्याम फरकुंडे, मोहन कुंभरे, मानिक आचले, छन्नुलाल नेवारगडे, जित्ते भाटीया आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)